
Mumbai News : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्तेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे विरोधी पक्षांच्या निशाण्यावर आले आहेत. त्यात महायुतीतील आमदारांचीही भर पडली आहे. आपच्या नेत्या व सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडूनही सातत्याने मुंडेंचे पिस्तुलधारी व्यक्तींसोबतचे फोटो सोशल मीडियात पोस्ट केले जात आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी गंभीर आरोप केले आहेत.
अमोल मिटकरी यांनी शुक्रवारी सोशल मीडियात याबाबत पोस्ट केली आहे. मिटकरी यांनी म्हटले आहे की, केवळ पंकजाताई व धनंजय मुंडे दोघे बहीण भाऊ एकत्र आल्याने महायुतीचे व विरोधातील आमदार एकत्र येऊन आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातुन जाणीवपपुर्वक धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीला संपवण्याचं पद्धतशीर काम करत आहेत. त्यासाठी एक सामाजिक कार्यकर्त्या कामाला लावल्या आहेत.
संजय राऊत व सुरेश धस यांनी यात उपमुख्यमंत्री अजितदादांना टार्गेट करणे सुरु केले आहे. या हत्याकांडातील आरोपी फासावर गेले पाहिजेत, ही धनंजय मुंडे साहेबांची सुरुवातीपासून भूमिका असताना या प्रकरणात धनंजय मुंडे यांचं राजकारण संपवण्याची सुपारी घेतल्याच्या भूमिकेत धस आले आहेत, अशी निशाणा मिटकरींनी साधला आहे.
दरम्यान, अंजली दमानिया यांच्याकडून बीड जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांवर सातत्याने निशाणा साधला जात आहे. त्यांनीच काही दिवसांपूर्वी कैलास फड याचा हवेत गोळीबार करतानाचा फोटो ट्विट केला होता. त्यानंतर त्यांच्याकडून सातत्याने हातात असलेल्या व्यक्तींचे फोटो ट्विट केले जात आहेत.
दमानिया यांच्याकडून बीडमधील गुन्हेगारीवर सातत्याने ट्विट करत नेत्यांवर वार केला जात आहे. कैलास फड व्हिडिओ फोटो ट्विट केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि गुरुवारी पोलिसांनी अटकही केली. फड हा मुंडेंचा कार्यकर्ता असल्याचा आरोप दमानियांनी केला आहे. गुरूवारी त्यांनी खुद्द धनंजय मुंडेंच्या हातात पिस्तूल असल्याचा फोटो पोस्ट केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.