MLC Election : विधान परिषदेची गाडी हुकली, एकनाथ शिंदेंच्या पक्षातील 'फायर ब्रँड' महिला नेत्या नाराज, म्हणाल्या, 'साहेब...'

Sheetal Mhatre Eknath Shind Shiv Sen : विधान परिषदेसाठी एकनाथ शिंदेंकडून निलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांना उमेदवारी जाहीर देण्यात आली. मात्र, उमेदवारी न मिळल्याने पक्षातील काही महिला नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे.
Sheetal Mhatre Eknath Shinde
Sheetal Mhatre Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Sheetal Mhatre News : विधान परिषद निवडणुकीसाठी एकनाथ शिंदें यांच्या शिवसेनेकडून बच्चू कडू आणि निलम गोऱ्हे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित झाले आहे. दरम्यान, शिंदेंच्या शिवसेनेत उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा होती. राज्यसभेला संधी हुकलेल्या नेत्यांकडून उमेदवारीसाठी प्रयत्न करण्यात येत होते. उमेदवारांची नावे निश्चित झाल्यानंतर काही नेत्यांनी खासगीत नाराजी बोलून दाखवली.

शिंदेंच्या शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या शितल म्हात्रे यांना उमेदवारी मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. राज्यसभेला त्यांची संधी हुकली होती.मात्र, विधान परिषदेला त्यांनी संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे उमेदवारीमध्ये ज्या नेत्यांची नावांची चर्चा होती. त्यामध्ये शितल म्हात्रे यांचे नाव सर्वात पुढे होते.

बच्चू कडू आणि निलम गोऱ्हे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेकडून तिसरा उमेदवार देखील न देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे म्हात्रे यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, म्हात्रे यांनी ट्विटवर पोस्ट करत आपली नाराजी व्यक्त करत एकनाथ शिंदेंचा आदेश शिरसावंद्य असे म्हटले आहे.

म्हात्रे यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, तू न थकेगा कभी, तू न रुकेगा कभी,तू न मुड़ेगा कभी,कर शपथ, कर शपथ, कर शपथ…साहेब, आपला आदेश शिरसावंद्य….

Sheetal Mhatre Eknath Shinde
MLA Election : बच्चू कडू-झिशान सिद्दीकींना उमेदवारी : सुनेत्रा पवार अन् एकनाथ शिंदेंचं भाजपला शांततेत प्रत्युत्तर

निलम गोऱ्हेंना उमेदवारी का?

निलम गोऱ्हे या सलग पाचव्यांना विधान परिषदेत जाणार आहेत. एकनाथ शिंदेंनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त करत त्यांना उमदेवारी जाहीर केली. गोऱ्हे या संयमी आणि अनुभवी नेत्या असल्याने त्यांना संधी मिळाल्याची चर्चा आहे.तसेच शिवसेनेत फूट पडल्यानंतर सुरुवातीला त्या उद्धव ठाकरेंसोबत होत्या. मात्र, एकनाथ शिंदेंवर विश्वास दाखवत त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेसोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्या वेळीच त्यांना पुन्हा विधान परिषदेवर संधी देण्याचा शब्द शिंदेंनी दिल्याची देखील चर्चा आहे.

Sheetal Mhatre Eknath Shinde
MLC election : विधान परिषदेच्या 10 जागांवर अवघ्या दोन महिला नेत्यांनीच काढलं 'नशीब'; दिग्गजांना धक्का देत पुन्हा खेचून आणली 'आमदारकी'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com