Mumbai High Court : बिनविरोध निवडणूक आलेल्या उमेदवारांचे नगरसेवकपद जाणार? मनसेची कोर्टात धाव; निवडणूक अधिकाऱ्यांनाही भेटले!

Avinash Jadhav MNS Court : राज्यात तब्बल 67 उमेदवार महापालिका निवडणूक निवडून आले आहेत. त्यांच्या निवडीला कोर्टाने स्थगिती द्यावी यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे.
Bombay High Court notice to MLAs MPs
Bombay High Court notice to MLAs MPsSarkarnama
Published on
Updated on

Avinash Jadhav News : महापालिका निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे बिनविरोध उमेदवार अनेक महापालिकांमध्ये निवडून आले आहेत. 65 पेक्षा अधिक उमेदवार बिनविरोध नगरसेवक झाले आहेत. मात्र, या बिनविरोध निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना धमकावून फाॅर्म मागे घेण्यास भाग पाडले, तर काही ठिकाणी निवडणूक कर्मचाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांशी सेटींग केल्याचा आरोप मनसेकडून केला जात आहे.

बिनविरोध निवडणूक आलेल्या उमेदवारांची निवड रद्द करावी किंवा त्यांच्या निवडीला स्थगिती द्यावी यासाठी मनसेचे नेते अविनाश जाधव हे मुंबई हायकोर्टात आज याचिका केली आहे. त्यामुळे बिनविरोध निवड झालेल्या सदस्यांचा फैसला कोर्टात होणार आहे. आत्तापर्यंत बिनविरोध उमेदवारांच्या निवडणुकी विरोधात तीन याचिका कोर्टात दाखल झाली आहे.

अविनाश जाधव हे आपल्या सहकाऱ्यांसोबत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटले. बिनविरोध निवडणूकीच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षांना धमकावले, स्थानिक निवडणूक कर्मचाऱ्यांनी देखील विरोधी पक्षांच्या उमेदवारांवर अन्याय करत त्यांचे फाॅर्म मुद्दामून बाद केल्याची तक्रार मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली तसेच पुरावे देखील त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना दिले.

Bombay High Court notice to MLAs MPs
Supreme Court : SC, ST, OBC प्रवर्गाला सर्वात मोठा दिलासा; भरती प्रक्रियेतील आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

राज ठाकरे आक्रमक, भाजपला सुनावले...

राज ठाकरे यांनी देखील बिनविरोध उमेदवारांच्या मुद्यावर भाजपला सुनावले आहे. ते म्हणाले, जेव्हा बंगालमध्ये ममता बॅनर्जींचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. तेव्हा भाजप कोर्टात गेला होता. ममता बॅनर्जींचा पक्ष उमेदवारांवर धमकावल्याचा आरोप लावत निवडीला स्थगिती देण्याची मागणी त्यांनी केली होती. आता त्यांनी ही बिनविरोध निवड चालते का असा सवाल त्यांनी केला.

Bombay High Court notice to MLAs MPs
Narayan Rane : दाऊदला 'टीप', उपशाखाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी, शिवसेनाप्रमुखांची विनंती अन् जीवनदान; नारायण राणेंचा नेमका काय आहे किस्सा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com