
भविष्यनामा : लेखक, साहित्यिकांसाठी हा काळ प्रतिकूल असून या क्षेत्रातील मोठ्या व्यक्तीच्या मृत्यूच्या घटना संभवतात. या शिवाय मोठ्या राजकीय/सामाजिक/धार्मिक क्षेत्रातील व्यक्तीचा मृत्यू या काळात संभवतो.संशोधन, वैज्ञानिक, बौद्धिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ प्रतिकूल राहील. या क्षेत्रातील व्यक्तींच्या मृत्यूच्या घटना या काळात संभवतात.अमेरिका-चीनमधील व्यापार युद्धाचा फटका दोन्ही देशांना बसू शकतो. प्रमुख व्यक्ती, सत्ताधारी पक्षाला त्रासदायक काळ राहील. सत्ताधारी पक्षांमध्ये फूट पडण्याची शक्यता राहील.
सध्या सर्वत्र हीच चर्चा आहे की असे काय ग्रहमान चालू आहे की एका मागून एक दुर्घटना होत आहेत. या संबंधित ग्रहयोगाचा आपण मागील लेखातून उल्लेख केला आहे. शनी-मंगळ कुयोगामुळे युद्ध, अपघात, घातपात, नैसर्गिक आपत्ती, विमान दुर्घटना, रेल्वे दुर्घटना, जहाज/बोट दुर्घटना, आगीचे अपघात होण्याची शक्यता आपण मागील लेखात वर्तविली होती. त्याप्रमाणे अहमदाबाद विमान दुर्घटना, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटना, रेल्वे दुर्घटना, मावळमधील पूल पडल्यामुळे झालेली हानी आपण अनुभवली आहे.
या कुयोगाचा परिणाम ११ जून ते नऊ ऑगस्ट पर्यंत तीव्रतेने जाणवणार आहे. याचा दुष्परिणाम सामान्य जनतेबरोबर, राज्यकर्ते व राजकीय व्यक्ती, नेते, सरकारी अधिकारी, पोलिस, लष्कर, खेळाडू यांचेसाठी विशेष त्रासदायक राहणार आहे. याच कुयोगामुळे रशिया-युक्रेनचे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता असून इराण-इस्राईल युद्धाचा दुष्परिणाम जगाला भोगावे लागण्याची शक्यता राहील.
युद्धाबरोबर, विमान दुर्घटना, वादळे, अतिवृष्टी, पूर, वीज पडून होणारी हानी, जुने पूल पडून होणारी दुर्घटना, जहाज, नौका दुर्घटना यातून होणारी हानी नऊ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण जगासाठी त्रासदायक असणार आहे.
या काळात कोरोना सारखा संसर्गजन्य विकार वाढणार असून सौम्य व औषधानी त्वरित बरा होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण वाढते राहील. २० जून रोजी सूर्य आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करीत असून या नक्षत्रावरील पाऊस मोठ्या प्रमाणावर होणार असून अनेक ठिकाणी पूर/अतिवृष्टीमुळे नुकसान संभवते. घरांची/पुलांची पडझड, वीज पडून होणारी दुर्घटना, जहाज बोट दुर्घटना यातून मोठी जीवित हानी पुढील काळात होण्याची शक्यता राहील.
ट्रम्प यांच्याविरुद्ध बंडखोरी होऊ शकते. सिंह राशीत मंगळ-केतू योग होत असल्यामुळे महाराष्ट्रातील सरकारमध्ये मोठ्या घडामोडी अनुभवास येतील. महायुतीमधील पक्षांमधील मतभेद चव्हाट्यावर येतील. मुंबईला अतिवृष्टीचा धोका संभवतो. काही राज्यातील सरकार अस्थिर होऊन सत्ताधारी पक्ष/आघाडीमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता राहील. या काळात पश्चिम किनारपट्टीवर वादळे, अतिवृष्टीचा धोका संभवतो. गोवा, कोकण, गुजरात, मुंबई या प्रदेशांना विशेष धोका राहील.
शाळा, कॉलेज प्रवेश प्रक्रियेमध्ये मोठा गोंधळ या काळात होण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांना मनस्ताप संभवतो. शेअर मार्केटमधील गोंधळाची स्थिती कायम राहणार असून बनावट तेजी या काळात संभवते. सोन्या-चांदीच्या भावातील तेजी कायम राहाण्याची शक्यता असून इराण-इस्राईल युद्धामुळे सोन्या-चांदीच्या भावात मोठी वाढ होऊन, याबरोबरच इंधन वाढ झाल्यामुळे महागाईमध्ये मोठी वाढ संभवते. या काळात सरकारी कर्मचारी, डॉक्टर यांचे संप/बंद होण्याची शक्यता राहील. या काळात मोठे गुन्हेगार/अतिरेकी पकडले किंवा मारले जातील. मात्र या काळात अपहरण, आत्महत्या, फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणावर अनुभवास येतील.
मेष : सप्ताहाची सुरुवात उत्साहवर्धक राहील. आनंददायक घटना घडतील. अचानक मोठे लाभ होतील. तृतीयेतील अमावस्या पराक्रम, कर्तृत्व सिद्ध करणारी असून मोठे धाडसी निर्णय घ्याल.
वृषभ : सप्ताहाच्या सुरुवातीला मोठा खर्च होईल. दूरचे प्रवास, सहली, मनोरंजन यामधून आनंद घ्याल. स्वभाव ‘मूडी’ होईल. धन स्थानातील अमावस्या आर्थिक प्राप्ती वाढविणारी राहील. मोठी गुंतवणूक कराल.
मिथुन : सप्ताहाच्या सुरुवातीला मोठा लाभ होईल. जुनी येणी वसूल होतील. मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. कुटुंबात अनपेक्षित घटना घडतील. राशीतील अमावस्या धार्मिक कल वाढविणारी राहील.
कर्क : सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरी-व्यवसायात मनासारखे बदल होतील. वरिष्ठांशी सुसंवाद राहील. सामाजिक/राजकीय क्षेत्रात उत्तम प्रतिसाद राहील.
सिंह : सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्यवर्धक घटना घडतील. प्रसिद्धी नावलौकिक वाढेल. तीर्थयात्रा कराल. लाभस्थानात होणारी अमावस्या मोठी इच्छा पूर्ण करणारी असून महत्त्वाच्या कामात यश मिळेल.
कन्या : सप्ताहाच्या सुरुवातीला प्रवास जपून करावेत. आरोग्याची काळजी घ्यावी. मात्र कमी श्रमात मोठे लाभ होतील. अनपेक्षित बातमी कळेल.
तूळ : सप्ताहाच्या सुरुवातीला तरुणांचे विवाह जमतील. जोडीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. भागीदारीतील व्यवसायात फायदा होईल. कोर्ट कचेरी/वादविवाद सामंजस्याने मिटतील.
वृश्चिक : सप्ताहाच्या सुरुवातीला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. पैसे किमती वस्तूंची काळजी घ्यावी. अष्टमातील अमावस्या आरोग्यासाठी प्रतिकूल असून प्रवासात काळजी घ्यावी.
धनू : सप्ताहाच्या सुरुवातीला संततीविषयक प्रश्न मार्गी लागतील. तरुणांना जोडीदार मिळेल. प्रेमप्रकरण यशस्वी होईल. शेअर्ससारख्या व्यवसायात लाभ होतील.
मकर : सप्ताहाच्या सुरुवातीला घर/जागेची कामे मार्गी लागतील. घरातील वातावरण आनंदी राहील. संततीविषयक कामात यश मिळेल. मात्र षष्टातील अमावस्या आरोग्यासाठी प्रतिकूल राहील.
कुंभ : सप्ताहाच्या सुरुवातीला आनंदाची बातमी कळेल. छोटे प्रवास, सहली, मनोरंजनातून आनंद मिळेल. भावंडांविषयी चांगल्या घटना होतील. नोकरीत बदलीचे प्रसंग येतील. पंचमातील अमावस्या संततीसौख्यासाठी अनुकूल राहील.
मीन : सप्ताहाच्या सुरुवातीला कुटुंबात आनंददायक घटना घडेल. पैशाची कामे होतील. भावंडे नातेवाइकांचा सहवास लाभेल. चतुर्थातील अमावस्या घर/वाहन/प्रॉपर्टी खरेदीसाठी उत्तम राहील
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.