Sumantai Patil : आमदार सुमनताई पाटलांची निधीवरून कोंडी; बांधकाम मंत्र्यांना खरमरीत पत्र लिहून विचारला सवाल

Letter To Minister Ravindra Chavan : बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीचे निमंत्रण आल्यानंतर ‘अनेकदा मागणी करूनही मला तुम्ही निधी दिला नाही, आता बैठकीला उपस्थित राहून कोणत्या कामाचा आढावा घेऊ?’ असे खरमरीत उत्तर सुमनताई पाटील यांनी बांधकाम मंत्री चव्हाण यांना दिले आहे.
Sumantai Patil-Ravindra Chavan
Sumantai Patil-Ravindra ChavanSarkarnama
Published on
Updated on

Tasgaon, 24 August : माजी उपमुख्यमंत्री (स्व.) आर. आर. पाटील यांच्या पत्नी तथा तासगावच्या आमदार सुमनताई पाटील यांची निधीवरून कोंडी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेकदा मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून निधी मिळाला नाही.

त्यामुळे बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीचे निमंत्रणाचे पत्र आल्यानंतर ‘अनेकदा मागणी करूनही मला तुम्ही निधी दिला नाही, आता बैठकीला उपस्थित राहून कोणत्या कामाचा आढावा घेऊ?’ असे खरमरीत उत्तर सुमनताई पाटील यांनी बांधकाम मंत्री चव्हाण यांना दिले आहे.

महायुती सरकारकडून आमदारांना निधी देताना दुजाभाव केला जात आहे. विरोधी पक्षातील आमदारांना निधीच मिळत नसल्याची तक्रार महाविकास आघाडीच्या आमदारांकडून केली जात होती. ते आता (स्व.) आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनीही बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना लिहिलेल्या पत्रातून उघड झाले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाची पुणे विभागीय बैठक शुक्रवारी (ता. 23 ऑगस्ट) पुण्यात पार पाडली. त्या बैठकीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण तासगावच्या आमदार सुमनताई पाटील यांनाही देण्यात आले होते. मात्र, त्या निमंत्रणाला सुमनताई पाटील यांनी दिलेल्या उत्तरावरून निधीबाबत होणारी कोंडी ठळकपणे दिसून येते.

रवींद्र चव्हाण यांना लिहिलेल्या पत्रत सुमनताई पाटील यांनी म्हटले आहे की, बांधकाम विभागाच्या कामाच्या 23 ऑगस्ट रोजीच्या आढावा बैठकीचे निमंत्रण मला मिळाले. त्या निमंत्रणाबद्दल मी आभारी आहे. पण, नागपूर येथे झालेल्या डिसेंबर-2023 मधील अधिवेशनादरम्यान आपली भेट झाली होती.

Sumantai Patil-Ravindra Chavan
Bhagirath Bhalke : राजकीय घडामोडींना वेग; सावंतांच्या पुतण्यानंतर भगीरथ भालकेंनी घेतली शरद पवारांची भेट

त्या भेटीत मी आपल्याकडे निधी देण्याची मागणी केली होती, त्यावेळी आपण (स्व.) आर. आर. आबांचा उल्लेख करून मी कोणत्याही पदावर नसताना मला आबांनी भरपूर मदत केली आहे, त्यामुळे आपण काळजी करू नका. तुम्हाला निधी देण्यात येईल, असे सांगितले होते.

त्या भेटीच्या चार ते पाच दिवसांनी मी आपल्याला कामाची यादी घेऊन भेटले, त्यावेळी आपण मला निधी देण्यासाठी असमर्थता दर्शवून दादांना भेटा, तरच निधी मिळेल, असे मला सांगितले होते.

त्यानंतर मी मार्च 2024 मधील अधिवेशनातही बांधकाम विभागाच्या कामासंदर्भातील कामाची यादी दिली. त्यावेळी (स्व.) आबांनी आपणास केलेल्या मदतीची आठवण करून देत आपल्याकडे निधीची मागणी केली होती. त्यानंतरही तुम्ही मला निधी दिला नाही.

निधी देण्याबाबत मला अडचणी आहेत, असे आपण सांगितले होते, त्यामुळे या बैठकीत आपणासोबत कोणत्या कामाचा आढावा घ्यावा, हा प्रश्न मला पडला आहे. त्यामुळे तुम्ही पाठवलेले आढावा बैठकीचे निमंत्रण मी स्वीकारते. पण बैठकीस उपस्थित राहू शकत नाही, असे सुमन पाटील यांनी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना स्पष्टपणे सांगितले.

Sumantai Patil-Ravindra Chavan
Karnataka Politics : राज्यपाल-सिद्धरामय्या वाद पेटला; काँग्रेस थावरचंद गेहलोत यांची राष्ट्रपतींकडे तक्रार करणार

बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि सुमनताई पाटील यांच्यातील पत्र व्यवहारावरून आमदारांच्या निधीबाबत किती अडवाआडवी होत आहे, हे दिसून येत आहे, त्यामुळे सुमन पाटील यांनी आढावा बैठकीला उपस्थित राहून आम्ही कुठल्या कामांचा आढावा घ्यायचा, असा प्रश्न रवींद्र चव्हाण यांना विचारला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com