Modi masterstroke: मोदींचा 'मास्टरस्ट्रोक'! निवडणुकीच्या रणधुमाळीत देणार रणनीतीचा मंत्र; मुंबईतील आमदार, खासदारांशी साधणार संवाद

Modi election strategy News : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. त्यातच आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पीएम नरेंद्र मोदी कानमंत्र देणार आहेत.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात दिवाळींनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे निवडणुकीची तयारी सर्वच पक्ष युद्धपातळीवर करीत आहेत. त्यातच बुधवारी दुपारी नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. त्यातच आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पीएम नरेंद्र मोदी कानमंत्र देणार आहेत. त्यासाठी मुंबईत रात्री आठच्या सुमारास आमदार, खासदारांशी संवाद साधून ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीतच रणनीतीचा मंत्र देणार आहेत.

राज्यात येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. सर्वच पक्ष निवडणुकीच्या कामाला लागला आहेत. त्यातच आता मुंबई महापालिकेवर वर्चस्व पर्याप्त करण्यासाठी भाजपने (BJP) कंबर कसली आहे. त्यातच आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पार पडले. त्यानंतर आता मुंबईतील नेत्यांना ते कानमंत्र देणार आहेत, त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

PM Narendra Modi
BJP Politics : पदवीधर निवडणुकीत भाजपकडून महाविकास आघाडी चेकमेट, राष्ट्रवादीचा मुख्य चेहराच फोडला

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन नरेंद्र मोदी (Narendra modi) पार पडले. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योजक गौतम अदानी उपस्थित होते. त्यानंतर आता बुधवारी रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजभवनात मुंबईतील भाजप आमदार व खासदारांसोबत संवाद साधणार आहेत. आज रात्री आठ वाजता राजभवनमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ते कानमंत्र देणार आहेत.

PM Narendra Modi
Shivsena UBT Politics: शिवसेनेच्या आंदोलनाच्या दबावामुळेच मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या पॅकेजची घोषणा, मात्र फसवा फसवी करू नका!

या संवाद बैठकीस पीएम नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील आमदार, खासदार आणि मंत्र्यांना पंतप्रधान कानमंत्र देणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या बैठकीत मोदी पक्षातील नेत्यांना काय मार्गदर्शन करणार याबाबत उत्सुकता शिगेला पोंहचली आहे.

PM Narendra Modi
Santosh Deshmukh Case : 'देशमुख प्रकरणाचा पद्धतशीरपणे नायनाट केला..', जरांगेंचा सरकारवर निशाना

हालचालींना आला वेग

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. यामध्ये जिल्हा परिषदत असेल, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या बैठका दौरे सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपने देखील तयारीला सुरुवात केली आहे. मुंबई महानगपालिकेसह इतर निवडणुकांच्या दृष्टीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील सर्व आमदार आणि खासदार यांच्यासोबत संवाद साधणार आहेत.

PM Narendra Modi
NCP Vs Congress : स्थानिकच्याआधी काँग्रेसला हादरा, तटकरेंच्या गळाला लागला काँग्रेसचा बडा नेता; तळकोकणात ताकदही वाढली

पीएम मोदी यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी विजयी रणनीतीचा 'कानमंत्र' देण्यासाठी ही बैठक बोलावली आहे. गटबाजी आणि अंतर्गत वाद टाळण्यासाठी मोदी स्वयंशिस्त आणि एकजुटीचा संदेश देण्याची शक्यता आहे.या बैठकीत प्रत्येक लोकप्रतिनिधीला त्यांच्या क्षेत्रातील बूथ स्तरावरची जबाबदारी निश्चित करून दिली जाणार असल्याचे समजते.

PM Narendra Modi
Shiv Sena Symbol Case : शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणाच्या सर्वोच्च सुनावणीआधीच असीम सरोदेंचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप, उपस्थित केला 'हा' मोठा प्रश्न

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com