Amol Kolhe News : महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणात औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापला आहे. हिंदुत्त्ववादी संघटनांकडून औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची मागणी केली जात आहे. राज्य सरकारमधील काही मंत्री देखील या मागणीचे समर्थन करत आहेत. नागपूरमध्ये नुकतीच दंगल देखील झाली. या सगळ्या पार्श्वभूमीवर औरंगेजबाच्या कबरीबाबात राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका मांडली आहे.
खासदार कोल्हे म्हणाले, 'देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेशी मी सहमत आहे. क्रुरकर्म औरंग्याच्या कबरीचे महिमामंडन केले जाऊ नये. ते सहन केले जाणार नाही. ही प्रत्येक शिवशंभू भक्ताची भावना आहे. परंतु औरंग्याची बखर मराठ्यांच्या असीम अशा शौर्याचं प्रतीक आहे. जो कोणी महाराष्ट्राकडे बघेल त्याची अवस्था हीच होईल. हे पूर्ण हिंदुस्थानला दाखवून देणारी ही कबर. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाने या परिसरामध्ये मराठ्यांच्या शौर्याचे स्मारक उभं केलं पाहिजे. ही माझी मागणी ही संसदेत करणार आहे.'
'छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, ताराराणीबाईसाहेब, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, अठरा पगड जातीच्या मावळ्यांनी तब्बल 27 वर्ष औरंग्याला दख्खनमध्ये महाराष्ट्रात टाचा घासायला लावल्या. आणि शेवटी त्याला इथेच मुठमाती दिली. याचं प्रतिक म्हणजे ती कबर. म्हणूनच या ठिकाणी महाठ्याच्या शौर्याचे स्मारक झालं पाहिजे.', असे खासदार कोल्हे म्हणाले.
कोल्हे म्हणाले की, 'महाष्ट्रातील तणावाची परिस्थिती पाहाता महाराष्ट्रातील तरुणांना कळकळीची विनंती करतो. कोणीची राजकीय पोळी भाजण्यासाठी स्वतःच्या आयुष्याची होळी होऊ देऊ नका. सत्ता येते जाते, राज्यकर्ते येतात जातात पण जर केसेस तुमच्या पाठी लागल्या तर तुमच्या करिअरमध्ये अडथळे येऊ शकतात. कोणत्याही अशांत राज्यामध्ये गुंतवणूक येत नाही. गुंतवणूक आली नाही तर उद्योगधंदे येत नाही. त्यामुळे रोजगार मिळत नाही. बेरोजगाराचे तांडे आपल्याला नकोत.'
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.