Video Nilesh Lanke : नीलेश लंकेसाहब, 'यह पब्लिक है, सब जानती है'; गज्या मारणेच्या भेटीवर बनवाबनवी का?

Nilesh Lanke reaction to Gaja Marne visit : पुण्यातील कुख्यात गुंड गज्या मारणे याच्या घरी जाऊन सत्कार स्वीकारणारे खासदार नीलेश लंकेंनी या कृतीवर प्रतिक्रिया दिली. मला संबंधितांची पार्श्वभूमी माहीत नव्हती. पण लंकेसाहब, 'पब्लिक सब जानती है', असे म्हणण्याची वेळ आली आहे.
Nilesh Lanke And Gaja Marne
Nilesh Lanke And Gaja Marnesarkarnama
Published on
Updated on

Nilesh Lanke And Gaja Marne News : खून, खंडणीच्या गुन्ह्यात महिनोमहिने तुरुंगवारी भोगून आलेल्या कुख्यात गज्या मारणेची 'क्राइम हिस्ट्री' साऱ्यांना ठाऊक आहे. या गज्या मारणेची पुणे आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात प्रचंड दहशत आहे, हेही कोणाला ठाऊक नाही, असे कोणीच असू शकत नाही.

दिवसागणिक कारनामे करणारा गज्या मारणे याचे उद्योग माहीत नसल्याचे सांगून खासदार नीलेश लंकेंनी दहशतीच्या दुनियेबाबत आपण कसे, अज्ञानी आहोत, असे दाखविण्याचा प्रयत्न केला. खासदार लंकेंचा हा प्रयत्न म्हणजे, 'मी फार साधा आणि जमिनीवरचा आहे, असा चेहरा यानिमित्ताने लोकांपुढे आणण्याचा डाव लंके करीत असावेत. पर 'यह पब्लिक है, सब जानती है भाई...'

कुख्यात गुंड गज्या मारणेकडून सत्कार स्वीकारला, त्यानंतर त्यावर ती कळत-नकळत झालेली चूक होती, असे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी त्यांचे अज्ञान उघडे पाडले आहेच, त्याशिवाय बालिशपणा देखील उघड पाडला. कुख्यात गुंड गज्या मारणे याच्या हस्ते सत्कारानंतर खासदार लंके यांच्या या कृतीवर टीकेची झोड उठली आहे. खासदार नीलेश लंके दिल्लीहून आल्यानंतर पुणे येथे उतरले होते. तिथे काही कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत असताना, त्यांनी पुण्यात (PUNE) कुख्यात गुंड गज्या मारणे याच्या घरी जाऊन सत्कार स्वीकारला. त्याचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.

विरोधकांनी यावर टीका करण्यास सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील, आमदार अमोल मिटकरी यांनी नीलेश लंके यांच्या भेटीचे पुरते वस्त्रहरण करण्यास सुरूवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत विजयाचा ज्यांचा सिंहाचा वाटा असतो, त्यांच्या भेटीगाठी घेऊन आभार मानण्यासाठी ते गेले असावेत, असा चिमटा अमोल मिटकरी यांनी काढला आहे.

Nilesh Lanke And Gaja Marne
Shivaji Kardile : शिवाजी कर्डिलेंनी आखला 'सगेसोयऱ्यांचा' राजकीय पटल; अजितदादांचं मिळणार बळ?

नीलेश लंके यावर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. नीलेश लंके यांनी दिलेली ही प्रतिक्रिया अगदी त्यांचे अज्ञान सांगणारी आहे. नीलेश लंके म्हणाले, "दिल्लीचे कामे उरकून मी पुणे येथे आलो. पुण्यात आमचे पवार नावाचे सहकारी होते. कॅन्सरच्या आजाराने त्यांचे निधन झाले. सांत्वन पर तिथे पवार कुटुंबियांची भेट घेतली. त्याच भागात राष्ट्रवादीचा (NCP) एक पदाधिकारी राहतो. त्यांना भेटण्यासाठी आम्ही गेलो होतो. त्यावेळी तेथून निघालो असताना मारणे याच्या घरासमोरून चाललो असताना, तेथे चार-पाच लोकांनी थांबवले. तिथे चहा प्यायला चला, असा आग्रह झाला. तोपर्यंत कोणाचीच पार्श्वभूमी माहिती नव्हती".

चहा प्यायलो, माझा सत्कार झाला. त्यानंतर मला दोन-तीन तासांनी मला संबंधित व्यक्तीची पार्श्वभूमी कळाली. तो अपघात होता. कळत-नकळत ती चूक झाली. टीका करणाऱ्यांचे दु्र्लक्ष करायचे. ज्या माणसाची ओळखच नाही, त्याची लोकसभेला कसली मदत. अख्या मतदारसंघात निवडणुकीसाठी एक गुंडप्रवृत्तीचा माणूस माझ्याबरोबर नव्हता. मी त्या गोष्टीला विरोध करणारा माणूस आहे, असे सांगून खासदार लंके यांनी गज्या मारणे याने केलेल्या सत्कारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला.

Nilesh Lanke And Gaja Marne
Video Vijay Wadettivar News : अण्णा जागे झाले याचा आनंद; वडेट्टीवारांनी लगावला टोला

त्यावेळी गज्या मारणेला अशा ठोकल्या होत्या बेड्या

तळोजा कारागृहात जामिनीवर सुटलेल्या गज्या मारणेंनी सबंध मुंबई-पुणे एक्सप्रेसवरून चारशे-पाचशे वाहनांचा ताफा आणून स्वतःची वरातच काढून घेतली. तेव्हाच पुण्यापुरता दहशत माजविणारा मारणे राज्यभरात चर्चेत आला. यानिमित्ताने मारणेने पोलिसांना चॅलेंज केले. त्याच्या मुसक्या आवळण्याची तयारी पोलिसांनी केली. तेव्हा त्याने पळही काढला होता. शेवटी त्याला त्याचे वकील विजयसिंह ठोंबरेंची भेट घेताना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com