BJP Vs NCP SharadChandra Pawar Party : 'कुछ भी कर के, अभी उसे वही पे रोको'; कोणासंदर्भात आहे हे...

MLA Rohit Pawar tweet that Karjat-Jamkhed election will be interesting in the state : कर्जत-जामखेड विधानसभा निवडणूक राज्यात लक्षवेधी होणार असल्याचे सूचक ट्विट आमदार रोहित पवार यांनी केले आहे.
Rohit Pawar
Rohit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : यंदाची विधानसभा राजकीय धुरळा दहा पट उडणार, असेच संकेत मिळू लागलेत. एकमेकांना पाडण्यासाठी सर्व पातळीवर राजकारणच होणार! महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी महायुतीची अनेक पातळीवर कोंडी केली असून, त्यांना लक्ष करण्याचे भाजपनं ठरवल्याचं दिसते.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी त्यासंदर्भात 'एक्स' खात्यावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. राज्यात लक्षवेधी होणाऱ्या निवडणुकींपैकी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाची होणार, असे दिसते आहे.

रोहित पवारांनी (Rohit Pawar) केलेल्या ट्विटमध्ये त्यांच्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाविषयी, असं म्हटलं आहे की, 'कुछ भी कर के, अभी उसे वही पे रोको', असं सांगितल्याने कर्जत-जामखेडची लढत राज्यात सर्वाधिक लक्षवेधी आणि तेवढीच इंटेरेस्टिंग होणार, हे नक्की आहे. पण मीही या महाकाय शक्तीसोबत दोन हात करायला सज्ज आहे. या महायुद्धात कर्जत-जामखेडकर स्वाभिमान आणि निष्ठा काय असते, ते या महाकायशक्तीला दाखवून देतील, असे विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.

Rohit Pawar
Balasaheb Thorat Vs Devendra Fadnavis : फडणवीस चक्रव्युहात कसे अडकले; थोरात म्हणाले, 'नको ते उद्योग केले'

रोहित पवार यांनी ट्विटमध्ये महाकायशक्ती असा उल्लेख केला आहे. त्यांचा रोख हा भाजपकडे (BJP) आहे. एकप्रकारने त्यांनी भाजपने कर्जत-जामखेड मतदारसंघाची निवडणूक किती मनावर घेतली आहे, त्याकडे लक्ष वेधले आहे. तसंच सध्या कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांना महाविकास आघाडीतील मित्र पक्षांकडून विरोध सुरू झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या मविआमधील स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी रोहित पवारांच्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकला आहे. याशिवाय काही निष्ठावान रोहित पवारांची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

Rohit Pawar
Eknath khadse : भाजप प्रवेशासाठी वेटिंगवर असलेले एकनाथ खडसे म्हणतात, 'मविआचे सरकार यावं...'

यातच कर्जत-जामखेडमध्ये सध्या बॅनर वॉर रंगला आहे. गेल्या महिन्याभार अनेक बॅनर झळकल्याने कर्जत-जामखेडमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले. भाजपने देखील कर्जत-जामखेड पुन्हा परत मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्नात आहे. एमआयडसीच्या मुद्यावर आमदार पवार आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्यात बरेच राजकारण गाजले. भाजप आमदार शिंदेंनी सत्तेच्या जोरावर आमदार पवारांवर कुरघोडी केली आणि त्यांना हवी तिथं एमआयडीसी मंजूर करून घेतली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेडमध्ये घमासान, अशी चिन्हं आहे.

भाजप अंतर्गत गोटात भीती

आमदार रोहित पवारांनी एका इंटरनॅशल स्रोतचा उल्लेख करत भाजपने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या अंतर्गत सर्व्हेवरून महायुतीवर उपरोधिक कोपरखळ्या लगावल्या. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 7-11, शिवसेना एकनाथ शिंदे गटाला 17-22 आणि भाजपला 62-67 जागा मिळून लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आहे. या सर्व्हेमुळे भाजपच्या अंतर्गत गोटात भीती पसरलीय. यातून केंद्रीय स्तरावरून अनेक हालचाली महाराष्ट्रात सुरू झाल्याकडे आमदार रोहित पवारांनी लक्ष वेधले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com