MP Supriya Sule : आर. आर. पाटलांच्या धोरणांनी खासगी सावकारांना सोलून काढले, सुप्रिया सुळेंनी गृहखात्याला सुनावले...

Akola Crime News : अकोला जिल्ह्यातील मनब्दा गावातील एका खासगी सावकाराने शेतकऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला. या प्रकारावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्याला सुनावले आहे.
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama

Akola News : अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्याला खासगी सावकाराने ट्रॅक्टरखाली चिरडण्याच्या प्रकारावर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी संताप व्यक्त केला. हा संतापजनक प्रकारावर खासदार सुळे यांना आर. आर. पाटील यांची आठवण झाली. शेतकरी (Farmer) आणि सर्वसामान्य जनतेला नडणाऱ्या, छळणाऱ्या मुजोर सावकारांना वेसन घालण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्याने पुढाकार घेण्याचे सुचवले आहे.

अकोला (Akola) जिल्ह्यातील मनब्दा (ता. तेल्हारा) गावातील एका खासगी सावकाराने शेतकऱ्यांवर (Farmer) प्राणघातक हल्ला केला. शेतकऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सावकाराच्या गुंडाने संबंधित शेतकऱ्याच्या शेताचा ताबा घेण्याचा प्रकार देखील केला. शेतकरी आणि त्याच्या कुटुंबाने त्याला विरोध केल्यावर त्यांना ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न गुंडांकडून केला. संबंधित शेतकऱ्याला, त्याच्या पत्नीला आणि शेतकऱ्याच्या वडिलांना मारहाण केली. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. महायुती भाजप (BJP) सरकारच्या काळात शेतकरी विरोधी धोरणांना खतपाणी मिळत असल्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Supriya Sule
Vidhan Parishad Election : मुंबई पदवीधर मतदारसंघावरून महायुतीमध्ये रस्सीखेच; शिंदे गटानंतर भाजपचा दावा

काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी या प्रकारावरून राज्य सरकारवर जोरदार हल्ला केला. याच मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या गृहखात्याला सुनावले आहे. अकोला जिल्ह्यातील हा प्रकार संतापजनक आहे. ही घटना कोणत्याही माणसाला चीड आणायला लावणारी आहे. सरकारी धोरणे शेतकरी विरोधी असल्याचा हा पुरावा आहे. शेती आणि विविध कारणांसाठी वित्तविषयक मदतीसाठी आजही खासगी सावकाराकडे जावे लागते, ही मोठी खेदाची बाब आहे.

खासदार सुळेंना आर. आर. पाटलांची झाली आठवण

खासदास सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी यावेळी राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या धोरणाची आठवण झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्याला सुप्रिया सुळे यांनी आर. आर. पाटील यांच्या धोरणांची आठवण करून दिली. आर. आर. पाटील गृहमंत्री असताना त्यांनी अशा मुजोर सावकारांना कोपऱ्यापासून ते ढोपरापर्यंत सोलून काढण्याचे धोरण स्वीकारले होते. त्यामुळे शेतकरी आणि सर्वसामन्य जनतेला छळणारा सावकारी पाश जवळपास अंतर्धान पावला होता. पण या सरकारच्या काळात खासगी सावकारांची मुजोरी पुन्हा एकदा वाढली आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला नडणाऱ्या, छळणाऱ्या मुजोर सावकारांना वेसन घालण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्याने पुढाकार घेण्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सुचवले आहे.

Supriya Sule
Milk Subsidy : मोठा दिलासा, 91 हजार दूध उत्पादकांना 76 कोटींचे अनुदान...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com