Vidhan Parishad Election : मुंबई पदवीधर मतदारसंघावरून महायुतीमध्ये रस्सीखेच; शिंदे गटानंतर भाजपचा दावा

ELection News : निवडणूक आयोगाने शुक्रवारी राज्यातील विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक जाहीर केली. यामध्ये मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर व नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 26 जूनला मतदान होणार आहे.
Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama

Mumbai Election : लोकसभा निवडणुकीचा धुराळा खाली बसल्यानंतर आता राज्यात विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक होणार असल्याने पुन्हा एकदा राज्यातील निवडणुकीचे रण तापणार आहे. या निवडणुकीची घोषणा होताच शिवसेना ठाकरे गटाने बाजी मारत मुंबई पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करून प्रचाराला सुरुवात केली आहे. दुसरीकडे महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाने उमेदवार देण्याची तयारी सुरु केली असतानाच या जागेवर भाजपने दावा सांगितला आहे. त्यामुळे येत्या काळात या दोन्ही पक्षात रस्सीखेच पहावयास मिळणार आहे.

निवडणूक आयोगाने शुक्रवारी राज्यातील विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक जाहीर केली. यामध्ये मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर व नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 26 जूनला मतदान होणार आहे. (Vidhan Parishad Election News)

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Girish Mahajan Vs Sanjay Raut News : गिरीश महाजन राऊतांवर बरसले; म्हणाले, त्यांचे डोकं तपासा...

ही जागा महायुतीमध्ये कॊणाला सुटणार यावरून अजून चर्चा झालेली नाही. तर सुरुवातीलाच शिवसेना (Shivsena) शिंदे गटाने मुंबई पदवीधरमधून उमेदवार द्यावा, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांची आहे. त्यामुळे माजी मंत्री डॉ. दीपक सावंत (Deepak Sawnat) या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे समजते.

या जागेवर महायुतीमधील भाजपनेही (Bjp) लक्ष केंद्रित केले आहे. दुसरीकडे या जागेसाठी भाजपसुद्धा उमेदवार देण्यासाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महायुतीमध्ये या जागेवरून येत्या काळात प्रमुख तीन घटक पक्षात चुरस पाहावयास मिळणार आहे. दुसरीकडे कोकण पदवीधर मतदार संघातून भाजपचे निरंजन डावखरे (Nirnjan Davkhare) हे विद्यमान आमदार असल्याने त्यांचा या जागेवर दावा असणार आहे. तर उर्वरीत तीन जागेवर शिवसेना शिंदे गट व भाजपमध्ये रस्सीखेच पाहावयास मिळणार आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघ हा परंपरेने शिवसेनेची जागा असल्याने शिंदे गटाचे नेते दीपक सावंत या पूर्वी या जागेवरून निवडून आले आहेत. त्यामुळे ही जागा महायुतीतील शिवसेनेने लढवावी असा त्यांचा आग्रह आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुंबई पदवीधर मतदारसंघांमध्ये याआधी शिवसेना ठाकरे गटाचे विलास पोतनीस हे आमदार होते. आता मुंबई पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परब यांचा विधानपरिषदेच्या आमदारकीचा कार्यकाळ 27 जुलै रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी देऊन विधान परिषदेच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.

त्यामुळे येत्या काळात महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट व भाजप नेत्याची बैठक हॊईल. त्या बैठकीतून ही जागा कॊणाच्या वाटयाला येणार हे समजणार आहे. त्यानंतर या ठिकाणच्या उमेदवाराची घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे ही जागा महायुतीमध्ये कॊणत्या पक्षाच्या वाट्याला येणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Vidhan Parishad Election News : लोकसभेचा धुराळा बसण्यापूर्वीच आणखी एका निवडणुकीची घोषणा; महाराष्ट्रातील वातावरण तापणार

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com