Kolhapur : मुश्रीफ-घाटगे एकाच पक्षात येणार? कार्यकर्त्यांना कुणकुण लागताच वातावरण टाईट

Kolhapur : विधानसभा निवडणुकीत उमेदवारीची कोंडी झाल्याने भाजपमधून समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तर त्यांचे राजकीय विरोधक वैद्यकीय शिक्षण मंत्री हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत आहेत
Kolhapur Political Conflict
Kolhapur Political ConflictSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा सातत्याने दबक्या आवाजात होत असतात. कधी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट, कधी जयंत पाटील आणि अजित पवार यांच्या भेटीमुळे या चर्चांना खतपाणी मिळते. नुकतीच कोल्हापूरमध्ये झालेल्या एका मेळाव्यात अशा प्रकारची जाहीरपणे चर्चा झाली. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? असा सवाल पुन्हा एकदा विचारला जात आहे. असे झाल्यास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांचे कट्टर विरोधक समरजीत घाटगे हे एकाच पक्षात येऊ शकतात. पण या नुसत्या विचाराने कोल्हापूरच्या राजकारणातील वातावरण गरम झाले आहे.

नुकताच कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी आणि प्रमुख नेते यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची चर्चा झाली. पण दोन्ही पक्ष एकत्र येण्याची सर्वात जास्त चर्चा झाली. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर, कार्यकर्त्यांनी काय करायचं ते सांगा अशी भूमिका जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवानंद माळी यांनी मांडली. त्यावर रामराजे कुपेकर यांनी कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठ स्तरापर्यंत मांडण्याची सूचना केली.

Kolhapur Political Conflict
Kolhapur Politics: काँग्रेस नेत्यांचं हेलिकॉप्टर कागलला का उतरलं नाही? पवारांचे कार्यकर्ते सतेज पाटलांवर तुटून पडले!

पक्ष एकत्र होण्याबाबत राज्यात जी काही चर्चा सुरू आहे, त्याबाबतच्या आपल्या भावना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापर्यंत पोहोचविल्या जातील. पुढे काय करायचे हे त्यांना विचारण्यात येईल’, असे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी स्पष्ट केले. या सर्व चर्चेची वस्तुस्थिती पाहता, राज्यातील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? अशीच शंका उपस्थित होत आहे.

Kolhapur Political Conflict
Kolhapur Bribe Case : 5 लाखांचं लाच प्रकरण शाहूवाडी तहसीलदाराच्या अंगलट; शिंदेंच्या आमदारांने थेट विधानसभेत केली 'ही' मोठी मागणी

असे झाल्यात सर्वात जास्त अडचण आणि डोकेदुखी कागल विधानसभा मतदारसंघात असणार आहे. कारण विधानसभा निवडणुकीत उमेदवारीची कोंडी झाल्याने भाजपमधून समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तर त्यांचे राजकीय विरोधक वैद्यकीय शिक्षण मंत्री हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत आहेत. यामुळे भविष्यात हे दोन पक्ष एकत्र आल्यास घाटगे आणि मुश्रीफ हे एकाच पक्षात पाहायला मिळतील. सध्याची परिस्थिती पाहता घाडगे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा जोरात सुरू आहे. त्यामुळे पुढील राजकीय आली नंतरच चित्र स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com