Paper Leak Case : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर आले होते. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक देखील केली होती. आता या पेपर फुटीचे धागेदोरे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्री कार्यालयापर्यंत पोहोचले आहे.
पेपरफुटी प्रकरणातील आरोपीच्या नंदूरबार येथील घरी मंत्री नरहरी झिरवळ यांचे विशेष कार्यकारी अधिकारी गणेश देवरे हे भाडेकरू असून ते पेपरफूटीपासून मंत्रालयातच आले नाहीत, असे वृत्त 'लोकसत्ता' या वृत्तपत्राने दिले आहे.
देवरे यांची नरहरी झिरवळ यांची नेमणूक ही रीतसर नव्हती. मात्र, ते मंत्री कार्यालयात कार्यरत होते, असे संबंधित वृत्तात म्हटले आहे. तसेच 25 ऑगस्टला शासनाच्या निर्णयानुसार त्यांना कार्यमुक्त करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान,मागील एक महिन्यापासून ते मंत्री कार्यालयात आले नसल्याचे देखील झिरवळ यांच्या खासगी सचिवाने सांगितले आहे.
झिरवळ यांच्या कार्यालयातील एका लिपीकार चार महिन्यांपू्र्वी मंत्रालयातच लाच घेतलाना अटक करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा पेपरफुटी प्रकरणात आणखी एक ओएसडीचे नाव समोर आल्याने झिरवळ यांचे कार्यालय चर्चांच्या केंद्रस्थानी आले आहे.
पेपर फुटी प्रकरणात एमपीएससीचे अवर सचिव अभिजीत लेंडवे, सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे, सहायक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नकात, कोचींग क्लास चालक प्रवीण पाटील यांच्यासह आणखी दोघाना अटक करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.