MSRTC Employees : एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! दिवाळीपूर्वी मिळणार ८३ हजार कर्मचाऱ्यांना पगार; प्रताप सरनाईकांचे प्रशासनाला निर्देश

Pratap Sarnaik On MSRTC Salary Before Diwali : एसटी महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पगाराच्याबाबत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी महत्वाचे निर्देश दिले आहे.
Transport Minister Pratap Sarnaik announces Diwali Salary
Transport Minister Pratap Sarnaik announces Diwali SalarySarkarnama
Published on: 
Updated on: 

MSRTC Employees Diwali Salary News : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महामंडळातील सुमारे ८३ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असून नोव्हेंबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वीच मिळणार आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत.

दिवाळीपूर्वी पगार देण्यासाठी हालचाली

एसटी महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन साधारणपणे दर महिन्याच्या ७ ते १० तारखेदरम्यान अदा केले जाते. मात्र, यंदा ६ नोव्हेंबरपासून दिवाळी सणाला सुरुवात होत असल्याने कर्मचाऱ्यांना सणापूर्वीच वेतन मिळावे, यासाठी प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलावीत, अशा सूचना सरनाईक यांनी दिल्या आहेत.

दिवाळीच्या काळात कुटुंबीयांसाठी खरेदी, घरगुती खर्च आणि सणासुदीचे नियोजन करता यावे, यासाठी कर्मचाऱ्यांच्या हातात वेळेत पगार पडणे महत्त्वाचे आहे. ही बाब लक्षात घेऊन परिवहन मंत्र्यांनी वेतन वितरणाच्या प्रक्रियेला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत.

Transport Minister Pratap Sarnaik announces Diwali Salary
Pratap Sarnaik On Jitendra Awhad threat : जितेंद्र आव्हाडांना धमक्या, सरनाईकांचा आनंद परांजपेंकडे पाहून टोला; नेमकं काय म्हणाले?

निधीसाठी पाठपुरावा करण्याचे निर्देश

दिवाळीपूर्वी वेतन देण्यासाठी एसटी महामंडळाच्या अर्थ व नियोजन विभागाने शासनाकडे तातडीने पाठपुरावा करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आवश्यक असलेले अनुदान तसेच प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या विविध सवलत योजनांच्या प्रतिपूर्तीपोटी शासनाकडून मिळणारी प्रलंबित रक्कम वेळेत उपलब्ध व्हावी, यासाठी विशेष प्रयत्न करण्यासही सांगण्यात आले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार

एसटी महामंडळाच्या आर्थिक अडचणींमुळे कर्मचाऱ्यांच्या सणाच्या आनंदावर विरजण पडू नये, यासाठी प्रशासनाने या विषयाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे. शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून घेण्यासाठी समन्वय साधणे, वेतन वितरणाचे योग्य नियोजन करणे आणि दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना पगार मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेणे, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

Transport Minister Pratap Sarnaik announces Diwali Salary
Pratap Sarnaik Narendra Mehta dispute : सरनाईक-मेहता पुन्हा आमनेसामने; ‘बेकायदा बांधकाम’च्या आरोपांनी मिरा-भाईंदरमध्ये खळबळ

त्यामुळे एसटी महामंडळातील सुमारे ८३ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंत्र्यांनी निर्देश दिले असले, तरी प्रत्यक्ष वेतन जमा होण्याची तारीख आणि निधी उपलब्धतेबाबतची अधिकृत माहिती महत्त्वाची ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com