Pratap Sarnaik Narendra Mehta dispute : सरनाईक-मेहता पुन्हा आमनेसामने; ‘बेकायदा बांधकाम’च्या आरोपांनी मिरा-भाईंदरमध्ये खळबळ

Pratap Sarnaik alleges illegal construction permission involving Narendra Mehta's Seven Eleven company; Mehta denies the charges : सेव्हन इलेव्हन कंपनीच्या प्रकल्पाला न्यायालयाच्या आदेशानंतरही परवानगी दिल्याचा प्रताप सरनाईक यांचा आरोप; नरेंद्र मेहता यांनी आरोप फेटाळले
Pratap Sarnaik Narendra Mehta dispute
Pratap Sarnaik Narendra Mehta disputeSarkarnama
Published on
Updated on

Mira Bhayandar politics : एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार नरेंद्र मेहता पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. काही दिवसांपूर्वी मिरा-भाईंदर महापालिकेच्या नाट्य सभागृहावरून दोघांमध्ये वाद पेटला होता.

आता मंत्री सरनाईक यांनी आमदार मेहता यांच्या कंपनीवर बेकायदा बांधकाम केल्याचा आरोप केला आहे. आमदार मेहता यांनी नेहमीप्रमाणे हे आरोप फेटाळून लावले आहेत.

मंत्री सरनाईक यांनी, न्यायालयाचे आदेश असतानाही भाजपचे (BJP) आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कंपनीचा सहभाग असलेल्या बांधकाम प्रकल्पाला पालिकेकडून बेकायदा परवानगी देण्यात आल्याचा गंभीर आरोप आरोप केला. तसेच यात एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याची कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक असल्याचाही गौप्यस्फोट केला.

मिरा रोड येथील दोन जमीन मालकांनी आपल्याकडे यासंदर्भात तक्रार केल्याचे दाखला मंत्री सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी केला. परवानगी देण्याबाबत कारवाई करू नये, असे न्यायालयाने सांगितले असतानाही नगररचना विभागाकडून बांधकाम परवानगी देण्यात आली. यात न्यायालयाचा अवमान झाला असून, यासंदर्भात मी पालिकेला पत्रसुद्‍धा दिले होते. त्यानंतरही पालिकेने प्रकल्पाला बेकायदा बांधकाम परवानगी दिली.

Pratap Sarnaik Narendra Mehta dispute
Pratap Sarnaik Vs Narendra Mehta : 10 कोटींचे उत्पन्न सिद्ध करा, नाहीतर राजीनामा द्या; मेहतांचे सरनाईकांना थेट चॅलेंज

या प्रकरणात सेवन इलेव्हन कंपनीसह अनेक बड्या व्यक्ती भागीदार असून, एका सावंत नावाच्या निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने तब्बल 20 कोटी रुपये या प्रकरणात गुंतवले असल्याचा दावा मंत्री सरनाईक यांनी करत खळबळ उडवून दिली. दरम्यान, प्रताप सरनाईक यांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाही. आमची कंपनी सर्व कामे नियमानुसारच करते, असे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी म्हटले आहे.

Pratap Sarnaik Narendra Mehta dispute
MNS BJP clash : मनसेच्या शिर्केंना 14 दिवसांची कोठडी; भाजपच्या 2 नगरसेवकांसह 7 जणांवरही गुन्हा

मंत्री सरनाईक यांनी नगररचना विभागाला भेट देऊन यासंदर्भातील कागदपत्रांची पाहणी केली. याप्रकरणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे तसेच मुख्य सचिवांकडे तक्रार करत चौकशीची मागणी देखील केली. त्यासाठी कागदपत्रे सील करून ताब्यात घेण्याच्या सूचना पोलिसांना केल्या आहेत. संबंधित वास्तुविशारदाचा परवाना रद्द करण्यात यावा व विकसकांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी केली असल्याची माहितीही सरनाईक यांनी या वेळी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com