MVA alliance news : उद्धव ठाकरेंच्या भेटींनंतर जयंत पाटलांचे माविआबाबत मोठे वक्तव्य; म्हणाले, 'एकत्रित निवडणूक लढणार...'

Jayant Patil statement News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवेळी दोघांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली.
jayant Patil.
jayant Patil.Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे चारच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांची धावपळ सुरु झाली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी दुपारी मातोश्रीवर जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवेळी दोघांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली. त्यानंतर पत्रकरांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

यावेळी बोलताना जयंत पाटील (Jayanat Patil) यांनी स्पष्ट केले की, येत्या काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र यावी, अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे त्याबाबतच्या अनेक मुद्द्यावर उद्धव ठाकरेंसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. आम्ही दोघेजणही निष्कर्षपर्यंत पोहचलो आहोत. त्यामुळे आता येत्या काळात जिथे शक्य असेल त्या ठिकणी एकत्रित निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

jayant Patil.
BJP Rebel Fear : भाजपला सतावतेय बंडखोरीची भीती, बाहेरून आलेल्या उमेदवारांमुळे निष्ठावंतांमध्ये खदखद!

महाविकास आघाडी करीत असताना राज्यभरात स्थानिक नेत्यांच्या मताचा विचार करण्यात येणार आहे. त्यांना बाजूला ठेवून कोणताच निर्णय घेण्यात येणार नाही. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबतची आजची चर्चा पूर्ण झाली नाही. त्यामुळे येत्या काळात आणखी एक-दोन वेळा याच विषयावर चर्चा होईल. ही चर्चा पूर्ण झाल्यानंतर आघडीबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येणार असलयाचे त्यांनी सांगितले.

jayant Patil.
Kolhapur Shivsena : शिवसैनिकांचा संयम संपला,नेत्यांचं टेन्शन वाढलं, काल झालेली आघाडी तुटण्याची शक्यता

येत्या काळात उद्धव ठाकरे यांच्यासोबत आणखीन चर्चा होईल, असे मला वाटते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पर्यंत चर्चा सुरु राहणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीबाबत सर्वच पक्षाचे नेते याबाबत चर्चा करून योग्य निर्णय घेतील, असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

jayant Patil.
NCP News : पुण्यानंतर आता ठाण्यात दोन राष्ट्रवादींची 'दिलजमाई'; एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढणार?

प्रशांत जगताप यांनी पक्ष सोडून जाण्याने दुःख झाले

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप यांनी ऐनवेळी पक्ष सोडून जाण्याने दुःख झाले आहे. त्यांनी विधानसभा निवडणूकदेखील लढवली आहे. पक्ष सोडण्यापूर्वी त्यांची माझ्याशी चर्चा झाली नाही. जगताप यांनी पक्ष सोडून जाण्यापूर्वी माझ्यासोबत चर्चा करायला हवी होती, असेही जयंत पाटील म्हणाले.

jayant Patil.
Congress BMC election : आघाडी तुटूनही काँग्रेस निभावणार छुपी मैत्री? मुंबईत ठाकरेंना फायदा होण्यासाठी व्यूहरचना

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com