MSC Bank Case : बँक घोटाळ्याप्रकरणी अजितदादांना दिलासा मिळणार का? हजारेंसह तक्रारदारांना नोटिसा

MSC Bank Scam Case : न्यायालयाच्या भूमिकेवर तक्रारदार काय भूमिका मांडतात? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
anna hazare ajit pawar
anna hazare ajit pawarsarkarnama
Published on
Updated on

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण बंद करण्याच्या अहवालानंतर विशेष न्यायालयाने तक्रारदारांना नोटिसा बजावून म्हणणे मांडण्याच्या सूचना केल्या आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ( Anna Hazare ), शालिनीताई पाटील, माणिकराव जाधव आणि किसान कावड यांनी या घोटाळ्याबाबत तक्रार केली होती. ( Court notice Anna Hazare Msc Bank Scam case )

anna hazare ajit pawar
BJP News : भाजपचा आणखी एक राजकीय धक्का? पश्चिम महाराष्ट्रातील पवारांच्या निकटवर्तीयाला पक्षात घेण्याच्या हालचाली

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करण्याचा अहवाल दुसऱ्यांदा सादर केला आहे. या अहवालावर मूळ तक्रारदारांनी म्हणणे मांडण्यासाठी विशेष न्यायालयाने नोटिसा काढल्या आहेत. यावर तक्रारदार काय भूमिका मांडतात, याकडे लक्ष लागले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडी सरकार असताना उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) आणि इतर संशयितांविरोधात सबळ पुरावे नसल्याने प्रकरण बंद करण्याचा अहवाल आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी न्यायालयासमोर सादर केला होता. यावर तक्रारदारांनी आक्रमक भूमिका घेत विशेष न्यायालयात निषेध याचिका दाखल केली होती. दाखल पुराव्याच्या आधारे तपास करण्याची आणि प्रकरणातील संशयितांना समन्स बजावण्याची मागणी केली होती. यावर तपास यंत्रणेनं न्यायालयासमोर पुढील तपास करण्यासाठी परवानगीची मागणी केल्यावर ती मान्यदेखील करण्यात आली.

anna hazare ajit pawar
Shirdi Lok Sabha Constituency: मोठी बातमी : खासदार लोखंडेंना भाजपचा शिर्डीतून विरोध

विशेष न्यायालयाने तपास यंत्रणेला यावर दाखल तक्रारीवर तपास कुठपर्यंत आलाय आणि तो कधीपर्यंत पूर्ण होईल याची विचारणा केली. याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचा आदेश दिला. यावर आर्थिक गुन्हे शाखेनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संशियातांविरोधात पुरावेच नाहीत, असे सांगितले. याशिवाय प्रकरण बंद करण्याचा अहवाल सादर केला. हा अहवाल आर्थिक गुन्हे शाखेनं दुसऱ्यांदा सादर केला आहे. यावर विशेष न्यायालयाने मूळ तक्रारदारांना नोटिसा काढून म्हणणे सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.


( Edited By : Akshay Sabale )

R

anna hazare ajit pawar
CM Shinde Sangli Tour : जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री उतरणार; शिवसेनेकडून जोरदार तयारी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com