Heavy Rain : मुंबई पाणी तुंबलं, भाजपच्याच आमदाराची कबुली; कालिदास कोळंबकर नेमकं काय म्हणाले?

BJP MLA Kalidas Kolambkar reaction On Mumbai heavy rain : मागील चार ते पाच दिवसांपासून राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला असून मुंबईतदेखील पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Mumbai Heavy Rain
Mumbai Heavy Rainsarkarnama
Published on
Updated on

Mumbai Monsoon Heavy Rain News : मुंबईसह राज्यभरात मागील चार ते पाच दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबईतही मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. याचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना बसला असून, झाडे कोसळणे, उघडे मॅनहोल आणि घर कोसळण्याच्या घटनांमुळे तब्बल १० ते १२ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यंदाच्या मान्सूनमध्ये मुंबईत पावसामुळे घडणाऱ्या दुर्घटनांचे प्रमाण वाढत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यावरून आता विरोधकांकडून सत्ताधारी भाजपला घेरले जात असून जोरदार टीका होताना दिसत आहे. दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांनी या टीकेवर उत्तर देताना, "भाजपला दोष देऊ नका, यंदा पाऊसच खूप जास्त आहे," अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईत मागील चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध भागांत भीषण दुर्घटना घडल्या आहेत. चेंबूर, कुर्ला आणि मानखुर्द या भागांत गंभीर घटना घडल्या असून, एकट्या मानखुर्दमध्ये मजली इमारत कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. झाडे कोसळणे, झाडांच्या फांद्या तुटणे आणि उघड्या मॅनहोलमुळे आणखी ४ जणांचा मृत्यू झाला आहे. या सर्व घटनांनंतर आता सत्ताधारी भाजपवर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात असून, पावसापूर्वी करावयाची कामे वेळेत का करण्यात आली नाहीत, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

यावर महापौर रितू तावडे यांच्यासह मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार अमित साटम यांनीदेखील उत्तर दिले आहे. तसेच आज (ता. ६) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सभागृहात निवेदन सादर केले आहे. अशातच आता भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

Mumbai Heavy Rain
Maharashtra Heavy Rain : धाकधूक वाढली! मुंबईत एकाच दिवसात झाडे पडण्याचा आकडा धक्कदायक; सीएम फडणवीसांनी थेट सभागृहातच पावसाबाबत दिली महत्त्वपूर्ण माहिती

आमदार कोळंबकर म्हणाले, "सध्या खूप जोरदार पाऊस पडत आहे. इतक्या वर्षांत असा पाऊस पडला नव्हता. त्यातच यंदा झाडे कोसळण्याच्या घटना अधिक घडल्या, जे इतक्या वर्षांत कधी घडले नव्हते. या घटनांमध्ये काहींचा जीवही गेला. आता प्रशासनाने या घटनांमधून काही गोष्टी शिकल्या पाहिजेत. भविष्यात अशी संकटे येऊ नयेत म्हणून विचार करायला हवा," असा घरचा आहेरही त्यांनी भाजपला दिला आहे.

Mumbai Heavy Rain
Mumbai Heavy Rain: मुंबईसह राज्यात तुफान पाऊस, अधिवेशनालाही फटका! आमदार अडकून पडले; विधानसभा अध्यक्ष मोठा निर्णय घेण्याची शक्यता

तसेच, "भाजपला दोष देऊ नका, यंदा पाऊसच खूप जास्त आहे. यावेळी जेवढा पाऊस पडत आहे, तेवढा यापूर्वी कधी पडला नव्हता. आधीचे जे सत्ताधारी होते, त्यांनी काय केले ते मला माहिती आहे. मी आधी नगरसेवक होतो. त्यामुळे मला सगळं काही माहिती आहे. इतरांना दोष देणे योग्य नाही. आलेल्या संकटाचा सामना करणे हाच सर्वांत महत्त्वाचा आणि पहिला पर्याय आहे," असेही भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com