Maharashtra Heavy Rain : धाकधूक वाढली! मुंबईत एकाच दिवसात झाडे पडण्याचा आकडा धक्कदायक; सीएम फडणवीसांनी थेट सभागृहातच पावसाबाबत दिली महत्त्वपूर्ण माहिती

Devendra Fadnavis rain update: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर पाणी आल्यामुळे हा महामार्ग बंद पडला आहे. मुंबई-पुणे रेल्वे मार्गही ठप्प झाला आहे. राज्यात घडलेल्या या सगळ्या घटनांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सभागृहात माहिती दिली.
Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis
Maharashtra Chief Minister Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Heavy rainfall in Maharashtra: राज्यात गेल्या चार दिवसापासून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागाला मुसळधार पावसामुळे फटका बसला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर पाणी आल्यामुळे हा महामार्ग बंद पडला आहे. मुंबई-पुणे रेल्वे मार्गही ठप्प झाला आहे. राज्यात घडलेल्या या सगळ्या घटनांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सभागृहात माहिती दिली. त्यासोबतच मुंबईत झाड उन्मळून पडण्याच्या घटनांबद्दल माहिती दिली.

मुंबईत दरवर्षी मान्सूनच्या पावसात सरासरी 800 झाडे कोसळतात. पण रविवारी एकाच दिवसात 350 झाडे पडली, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यासोबतच साधारणपणे ताशी 50 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. सोमवारचा दिवस त्याही पेक्षा गंभीर असून दुपारनंतर 70 ते 90 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहणार आहे. त्यामुळे वर्क फ्रॉम होमची विनंती त्यांनी केली आहे.

Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis
Maharashtra Politics Live Update : रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये उद्या बंद

मुंबईतील पावसाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी सभागृहात माहिती दिली. मुंबईत अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यासोबतच मानखुर्द भागात एक इमारत कोसळली आहे. राज्यातील काही भागात अनपेक्षित परिस्थिती निसर्गाच्या माध्यमातून तयार झाली आहे.

सभागृहात काही गोष्टी विरोधी पक्षाने उपस्थित केल्या आहेत. त्याचे गांभीर्य आहेच. मात्र या संदर्भात आपण लक्षात घेतले पाहिजे. सोमवारी दुपारनंतर 70 ते 90 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहणार आहे, त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे.

Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis
Maharashtra News Live Update : विप्लव बाजोरिया यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

मुंबईत झाडे कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामध्ये काही जणांना प्राण गमवावे लागले आहेत. मुंबईत यंदाच्या पावसाळ्यात झाडे कोसळण्याचे प्रमाणे वाढले आहे. चेंबूरमध्ये विद्यार्थ्यांच्या बसवर झाडे कोसळले होते.

यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. 10 विद्यार्थी जखमी झाले होते. दादर माटुंगा परिसरातही मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली आहेत. कुर्ला नौपाडा येथे झाडे कोसळून वृद्धाचा मृत्यू झाला.

Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis
Maharashtra Politics Update : दिवसभरात देश-विदेशात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

मुंबईत सोमवारी दुपारनंतर खूप मोठ्या प्रमाणात वारे असणार आहे. त्याचा झाडांवर परिणाम होऊ शकतो. त्या दृष्टीने लोकांनी सजग राहणे आवश्यक आहे. त्यासाठी सावध रहावे. शक्यतो प्रवास टाळावा.

अत्यंत गरजेचे असल्याशिवाय प्रवास करु नये. युवा वर्गाला विशेष आवाहन आहे, आजचे वारे पाहता त्यांनी टूरिजम टाळावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis
Maharashtra News Live Update : घुले खुन प्रकरणात SIT गठीत

कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळल्यानंतर लगेच यंत्रणा सज्ज होती. खूप लोक अडकली नाहीत. लगेच वाहतूक परावर्तित केली. गाड्या बाहेर काढत आहोत. आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे.

मंत्री गिरीश महाजन रात्री 1 वाजता मानखुर्द येथे होते, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. सोमवारचा दिवस महत्वाचा आहे. त्यामुळे अर्धवट निवेदन करण्याऐवजी सभागृहासमोर मंगळवारी संपूर्ण निवेदन करण्याचे आश्वासन यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis
Maharashtra News Live Update : अखेर ऑपरेशन टायगर झालेच! ओमराजे निंबाळकर शिंदेंच्या शिवसेनेत जाणार...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com