Protest against Gyanesh Kumar : दिपके, दास, ध्रुव राठीनंतर आता तुषार गांधींही पोलिसांच्या ताब्यात; मुंबईत कारवाई

Delhi Police action News : अभिजीत दिपके यांचे विमान दिल्ली विमानतळाच्या धावपट्टीवर उतरताच एक पोलीस पथक लगेच आत विमानात शिरले व त्यांना ताब्यात घेतले आहे.
Tushar gandhi
Tushar gandhi Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : दिल्लीच्या जंतर-मंतरवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन करण्याचे नियोजन कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि काही विद्यार्थी संघटनांनी शनिवारी केले होते, परंतु दिल्ली पोलिसांकडून या आंदोलनाला परवानगी देण्यास नकार देण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी दिल्ली विमानतळावरून सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके, सौरव दास यांना दिल्ली विमनातळावरच ताब्यात घेण्यात आले. तर प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ध्रुव राठीला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दुसरीकडे सीजेपीच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी महात्मा गांधीजींचे नातू तुषार गांधी यांनी मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा केली होती. त्यांनाही मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दिल्लीच्या जंतर-मंतरवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात कॉकरोच जनता पार्टी शनिवारी आंदोलन करणार होती. त्यासाठी अभिजीत दिपके यांचे विमान दिल्ली विमानतळावर लँड होण्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी या परिसरात प्रचंड फौजफाटा तैनात केला होता. अभिजीत दिपके यांचे विमान दिल्ली विमानतळावर उतरताच दिल्ली पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने जलद हालचाली केल्या. अभिजीत दिपके यांचे विमान दिल्ली विमानतळाच्या धावपट्टीवर उतरताच एक पोलीस पथक लगेच आत विमानात शिरले व त्यांना तब्यत घेतले आहे.

त्यानंतर काही वेळातच सौरव दास यांना दिल्ली विमानतळावरच ताब्यात घेण्यात आले. तर प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ध्रुव राठीला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या सर्व प्रकारानंतर सीजेपीच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मुंबईत तुषार गांधी यांनी आंदोलन करण्याची घोषणा केली होती. मुंबईत दुपारी वाजल्यानंतर ते आंदोलन करणार होते. तुषार गांधी यांना ही शनिवारी सकाळी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Tushar gandhi
Satara Politic's : उदयनराजेंच्या DCC बॅंक संचालक निवडीत बिनविरोध अन्‌ माघारीचीही हॅट्‌ट्रीक; एकाच नेत्याची तिसऱ्यांदा माघार...

महात्मा गांधीजींचे नातू तुषार गांधी यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वांद्रे नॅशनल कॉलेज परिसरातून तुषार गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुरुवातीला त्यांना वांद्रे पोलीस ठाणे त्यानंतर सांताक्रुज जुहू अशा पोलीस ठाण्यांमध्ये फिरवण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com