

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या राज्यातील महापालिकेच्या निवडणुकीसाठी एकीकडे भाजपणे आमदार व खासदारांच्या जवळच्या नातलगांना उमेदवारी दिलेली नाही. त्यामुळे काही अंशी कार्यकर्त्यांना संधी मिळाली आहे. तर दुसरीकडे मात्र महायुतीमधील मित्रपक्ष असेल्याया एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मात्र मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत घराणेशाही जोरात; मुंबईतील 8 वार्डात आमदार-खासदारांच्या नातलगांना संधी दिली आहे. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यानी केवळ सतरंजी उचलायची का असा सवाल विचारला जात आहे. त्यामुळे मुंबईतील वातावरण चांगलेच तापले आहे. नगरपालिका निवडणुकीत भाजपने मोठ्याप्रमाणात घराणेशाहीशी निगडित उमेदवारांना संधी दिली होती. त्यावेळी झालेल्या टीकेमुळे भाजपने महापालिका निवडणुकांत यु टर्न घेतला आहे. त्यातच आता दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने मुंबई महापालिका निवडणुकीत घराणेशाहीला संधी दिली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेने घराणेशाहीला प्राधान्य दिले आहे. पक्षातील आमदार, खासदारांची मुले आणि नातेवाईकांना मुंबई महानगरपालिकेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामध्ये, जवळपास 8 वार्डातून थेट आमदार-खासदारांच्या कुटुंबातील सदस्यांना तिकीट देण्यात आले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेवर (Shivsena) घराणेशाही आणि सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले, असे म्हणत टीका करणाऱ्या एकनाथ शिंदेंनी आपल्याच पक्षात घराणेशाही पुढे नेल्याचे पाहायला मिळत आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून वॉर्ड क्रमांक 169 मधून आमदार मंगेश कुडाळकर यांचा मुलगा जय कुडाळकर यांना उमेदवारी दिली आहे. वॉर्ड क्रमांक 191 मधून माजी आमदार सदा सरवणकर यांची कन्या प्रिया गुरव-सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे. तर, तसेच, चांदिवलीमधून वॉर्ड क्रमांक 163 मधून आमदार दिलीप लांडे यांची पत्नी शैला लांडे यांना उमेदवारी दिली आहे. चेंबूरमधून वॉर्ड क्रमांक 153 मधून आमदार तुकाराम कांते यांची सून तन्वी काते यांना उमेदवारी दिली आहे.
मुंबईतील जोगेश्वरी पूर्व वॉर्ड 73 मधून खासदार रविंद्र वायकर (Ravindra Waykar) यांच्या कन्या दिप्ती वायकर यांना उमेदवारी दिली आहे. भांडुप वॉर्ड 113 मधून आमदार अशोक पाटील यांचा मुलगा रुपेश अशोक पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अणुशक्ती नगर वॉर्ड क्रमांक 146 मधून आमदार तुकाराम काते यांच्या सूनबाई समृद्धी गणेश काते यांना शिवसेनेनं मैदानात उतरवलं आहे. असून धारावीतून वॉर्ड क्रमांक 183 मधून शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांची भावजय वैशाली नयन शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेने प्रामुख्याने 8 जणांच्या कुटुंबातील सदस्यांना शिवसेनेनं तिकीट दिले आहे. यासह अनेक ठिकाणी माजी नगरसेवक आणि पक्षातील वरिष्ठ पदाधिकांच्या घरातच उमेदवारी दिल्याने सामान्य कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. आठ जणांना उमेदवारी दिल्याने त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यानी करायाचे काय असा सवाल विचारला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.