Farmers Alert : मुंबई,पुणे, कोकणात धो धो पाऊस, पण 'या' जिल्ह्यांचं टेन्शन वाढलं; कृषी विभागानं शेतकऱ्यांना दिला गंभीर इशारा

Farmers advisory during monsoon Maharashtra : मुंबई, पुणे आणि कोकणात जोरदार पाऊस सुरू असताना राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची कमतरता आणि बदलत्या हवामानामुळे चिंता वाढली आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना महत्त्वाचा इशारा दिला आहे.
Crop protection advisory for farmers during monsoon
Crop protection advisory for farmers during monsoonSarkarnama
Published on
Updated on

मुंबई, पुणे आणि कोकण परिसरात गेल्या काही दिवसांत मुसळधार पाऊस झाला असला, तरी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही अपेक्षित असलेल्या प्रमाणात पाऊस झाला नाहीये. त्यामुळे काही भागातील शेतकऱ्यांची चिंता वाढली असून कृषी विभागाने विशेष सतर्कतेचा इशारा दिला आहे.

राज्यातील खानदेश विभागातील धुळे आणि नंदुरबार, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर व सोलापूर, तसेच पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. या भागांतील शेती मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून असल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

Crop protection advisory for farmers during monsoon
Navi Mumbai accident today : नवी मुंबईत भरधाव कारने 10 जणांना उडवलं; अंगावर काटा आणणारा थरार; क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं!

हवामान विभागाच्या अंदाजानुसार 8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. ही स्थिती पुढील सुमारे 10 दिवस कायम राहू शकते. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

याचबरोबर राज्यातील काही भागांत तापमानातही वाढ होण्याची शक्यता आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसाच्या तुलनेत महिन्याच्या उत्तरार्धात पावसाचे प्रमाण कमी राहू शकते, असा प्राथमिक अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना काळजीपूर्वक निर्णय घेण्याचा सल्ला दिला आहे. ज्या भागांत अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.असे आवाहन करण्यात आले आहे.

Crop protection advisory for farmers during monsoon
Top 10 News : भाजपा महिला आमदाराचा तरुणाला झापल्याचा ऑडिओ व्हायरल! ; तिथे चीनशी हातमिळवणी, इथे शेख हसीना यांच्या 'घर वापसी'ची तयारी; वाचा टॉप 10 महत्त्वाच्या घडामोडी!

तसेच उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, हवामानाच्या अंदाजावर लक्ष ठेवावे आणि स्थानिक कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार शेतीचे नियोजन करावे, असेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com