Navi Mumbai accident today : नवी मुंबईत भरधाव कारने 10 जणांना उडवलं; अंगावर काटा आणणारा थरार; क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं!

Car hits 10 people in Navi Mumbai : नवी मुंबईत भरधाव कारने 10 जणांना धडक दिल्याने मोठी खळबळ उडाली. या धक्कादायक अपघातातील जखमींची स्थिती, प्रत्यक्षदर्शींचे अनुभव आणि ताज्या घडामोडी जाणून घ्या.
Navi Mumbai accident today
Navi Mumbai accident today Sarkarnama
Published on
Updated on

नवी मुंबईत मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक अपघात घडला असून, भरधाव कारने अनेकांना चिरडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नवी मुंबईतील सेक्टर १० परिसरात हा भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने आलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने रत्स्यावरील नागरिक आणि वाहनांना जोरदार धडक बसली.

या अपघातात तब्बल 10 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून उर्वरित 8 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही जखमींची प्रकृती स्थिर असली तरी काहींची स्थिती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.

Navi Mumbai accident today
Crime News : एकनाथ शिंदेंच्या नगरसेवकाची महिला डॉक्टर, नर्सला मारहाण; रुग्णालयात घुसून धुडगूस

घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि आपत्कालीन पथके तातडीने घटनास्थळी पोहोचली. स्थानिक नागरिकांनीही मदतीसाठी धाव घेत जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली. अपघातानंतर चालक मात्र वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला.

या दुर्घटनेत अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकी, रिक्षा आणि एका कारचेही मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की काही वाहने अक्षरशः चक्काचूर झाली.

Navi Mumbai accident today
Congress Protest Nashik : आमचं आंदोलन मोठं होऊ नये म्हणून फडणवीसांनी नाशिकच्या ढगफुटीची अफवा पसरवली, कॉंग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

नवी मुंबई पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरु केला आहे. फरार चालकाचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध युद्धपातळीवर सुरु आहे.

या घटनेनंतर पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com