Sahar Shaikh Controversy: सोमय्यांची तक्रार, पोलिसांची नोटीस, अखेर माफीनामा..! DCM शिंदेंची 'मुंब्रा' प्रकरणात उडी, सहर शेख अन् तिच्या वडिलांना बोलावणं धाडलं

Thane Political News: मुंब्रा पोलिसांनी यानंतर एमआयएमची सहर आणि तिचे वडिलांना तिचे वडील यांना 3 दिवसांपूर्वी नोटीस बजावली होती. या नोटिशीत चिथावणीखोर वक्तव्य टाळ्यासोबतच समाजात असंतोष निर्माण होईल. किंवा एकात्मकेला बाधा पोहोचेल असं विधान न करण्याची तंबी दिली होती.
Sahar Shaikh  Eknath Shinde .jpg
Sahar Shaikh Eknath Shinde .jpgSarkarnama
Published on
Updated on

Thane News: ठाणे महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मुंब्य्रातीन एमआयएम पक्षाच्या नगरसेविका सहर शेख आणि तिचे वडील युनूस शेख यांनी विजयी सभेत धार्मिक तेढ निर्माण करणारं वक्तव्य करत करत नवा वाद ओढवून घेतला होता. 'कैसा हराया' म्हणत माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना डिवचत पाच वर्षांनी संपूर्ण मुंब्रा हिरवा करण्याचा इशारा दिला होता.

मुंब्रा पोलिसांनी यानंतर एमआयएमची सहर आणि तिचे वडिलांना तिचे वडील यांना 3 दिवसांपूर्वी नोटीस बजावली होती. या नोटिशीत चिथावणीखोर वक्तव्य टाळ्यासोबतच समाजात असंतोष निर्माण होईल. किंवा एकात्मकेला बाधा पोहोचेल असं विधान न करण्याची तंबी दिली होती.

ही नोटीस पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 168 नुसार मुंब्रा पोलिसांनी बजावली होती. माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सहर शेख यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी मुंब्रा पोलीस ठाण्याला भेट दिली.

माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे.त्यांनी सहर शेख यांनी माफी न मागितल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सहर शेख यांना दोनवेळा चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर सहर शेख यांनी पोलिसांकडे आपले स्पष्टीकरण देताना लेखी माफीनामा सादर केला आहे. यावर सोमय्या यांनी सहर तरुण असल्यानं तिचा माफीनामा स्विकारतो असं म्हटलं आहे.

Sahar Shaikh  Eknath Shinde .jpg
Kolhapur Ichalkaranji Mayor: कोल्हापूर, इचलकरंजीत महापौरपदाची लॉटरी कोणाला? दोन्ही महापालिकांसाठी OBC आरक्षण,रेसमध्ये कोण कोण?

स्वत: किरीट सोमय्या यांनीच याविषयी माहिती दिली होती. त्यात कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता, जर माझ्या बोलण्यामुळे कोणाचे मन दुखावले गेले असेल तर मी त्यासाठी दिलगिरी व्यक्त करत असल्याचं सहरनं आपल्या माफीनाम्यात म्हटलं आहे.

पण आता एमआय़एमच्या नवनिर्वाचित नगरसेवक सहर शेख यांनी ठाणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग 30 मधून विजय मिळवल्यानंतर सहर व युनुस शेख यांना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस शेख यांना भेटीला बोलावलं आहे.

Sahar Shaikh  Eknath Shinde .jpg
Vijay Wadettiwar : चंद्रपूर महापालिकेत सत्तासंघर्ष, भाजपच्या ऑपरेशन लोटसमधून नगरसेवकांना कोट्यवधींची बोली! वडेट्टीवारांचा धक्कादायक दावा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहर शेख यांच्या व्हायरल झालेल्या विधानांवरुन शुक्रवारी (ता.24)आपली पहिली प्रतिक्रिया देतानाच राज्यात कोणत्याही प्रकारची जातीय तेढ खपवून घेतली जाणार नसल्याचा गर्भित इशारा दिला होता. त्यानंतर शिंदेंनी चर्चेसाठी बोलावलं आहे. या भेटीनंतर मुंब्रा येथील राजकीय समीकरणे बदलणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

एकनाथ शिंदे हा ठाणे बालेकिल्ला समजला जातो. तर मुंब्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात जितेंद्र आव्हाड यांचं वर्चस्व राहिलेलं आहे. मात्र,शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं तिकीट नाकारल्यानंतर सहर शेखनं एमआयएमच्या तिकीटावर निवडणूक लढवली आणि जिंकलीही. त्यामुळे वादग्रस्त विधानांवर शिंदे सहर यांना समज देतात की ते पुढील काळात राजकीय गणितं बदलवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Sahar Shaikh  Eknath Shinde .jpg
Rahul Kul : राहुल कुल यांनीही साधलं टायमिंग , ZP निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना 'दे धक्का'; स्वत:बाबत जुळून आलेला 'योगायोग'ही सांगितला

सहर शेख यांनी मात्र यावर माफीनाम्यात स्पष्टीकरण देताना माझ्या पक्षाचा झेंडा हिरवा आहे, त्यामुळे मी राजकीय संदर्भात ते बोलले होते. जर माझ्या पक्षाचा झेंडा भगवा असता, तर मी भगवं करू असं म्हटलं असतं असंही स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता या राजकीय वादावर पडदा पडणार की पेटताच राहणार हे आगामी काळात दिसून येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com