Municipal Election Voting Process : महापालिकेसाठी EVM वर कितीवेळा बटन दाबवे लागणार? मतदान करण्यापूर्वी महत्त्वाचा नियम समजून घ्या!

EVM voting rules, municipal election voting process : महापालिका निवडणुकीत मतदान करण्यापूर्वी EVM वर किती वेळा बटन दाबायचं लागते? निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा नियम सोप्या भाषेत समजून घ्या.
how many times to press EVM button in municipal election
how many times to press EVM button in municipal electionSarkarnama
Published on
Updated on

सध्या राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. मुंबई, पुण्यासह एकूण 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. पण यावेळी मतदान करताना नागरिकांना एक महत्त्वाचा बदल अनुभवायला मिळणार आहे. मतदान करताना मत कसं नोंदवायचं आणि EVM वर किती वेळा बटन दाबायचं यासाठी एक वेगळी पद्धत महानगरपालिका निवडणुकीत मतदारांना अनुभवायला मिळेल. यासाठी काही वेगळे नियम आहेत, हे मतदानापूर्वी समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण योग्य माहिती नसेल, तर तुमचं मत अमान्य ठरू शकतं.

यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत ही प्रक्रिया आधीपेक्षा वेगळी असल्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदानाच्या आधीच हा संपूर्ण नियम सोप्या शब्दांत समजून घेणं महत्त्वाचं आहे. महानगरपालिका निवडणुकीत मतदान करताना ईव्हीएमवर नक्की किती वेळा बटन दाबायचं हा प्रश्न सर्वांना पडलाय.

how many times to press EVM button in municipal election
Agniveer permanent recruitment rules : अग्निवीर होणार 'परमनंट'! पण भारतीय लष्कराचे हे नवे मापदंड माहित आहेत का?

बहुसदस्यीय निवडणूक म्हणजे काय?

यंदा महानगरपालिकेची निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीने घेतली जाणार आहे. बहुसदस्यीय निवडणूक म्हणजे काय, तर महानगरपालिकेची निवडणूक ही प्रभाग रचनेनुसार होणार असून एका प्रभागात चार उमेदवारांचं पॅनल असणार आहे. अशावेळी चार उमेदवारांसाठी स्वतंत्र मतदान करावं लागणार आहे. यावेळी एका वॉर्डमधून एक नव्हे तर एका प्रभागात चार नगरसेवक निवडले जाणार आहेत. म्हणजेच तुमच्या प्रभागातून चार वेगवेगळे प्रतिनिधी महानगरपालिकेत जाणार आहेत.

आधीच्या पद्धतीत एका वॉर्डमधून फक्त एक नगरसेवक निवडला जायचा. त्या वेळी एक मतदार, एक उमेदवार आणि एक मत अशी सोपी रचना होती. ईव्हीएमवर फक्त एकदाच बटन दाबायचं आणि मतदान पूर्ण व्हायचं. मात्र आता ही पद्धत बदलली आहे.

नव्या रचनेनुसार एक वॉर्ड म्हणजे चार नगरसेवक. त्यामुळे एका मतदाराला चार उमेदवारांना मतदान करावं लागणार आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला ईव्हीएमवर चार वेळा बटन दाबावं लागेल. ही चारही मतं देणं बंधनकारक आहे. जर तुम्ही चारपैकी एखादं मत दिलं नाही, तर तुमचं संपूर्ण मतदान अवैध ठरू शकतं.

मतदान करताना तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिलं जाणार आहे. तुम्ही चार वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांना मत देऊ शकता. तसेच एखाद्या पक्षाचे चार उमेदवार तुम्हाला योग्य वाटत असतील, तर चारही मतं एकाच पक्षाला देण्याची मुभाही आहे. कोणत्याही प्रकारची अट किंवा बंधन यामध्ये नाही.

बहुसदस्यीय पद्धतीचा एक मोठा फायदा म्हणजे एका भागाला जास्त प्रतिनिधी मिळतात. त्यामुळे नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी अधिक लोक उपलब्ध राहतात. यामुळे महिलांना, मागास घटकांना आणि विविध सामाजिक गटांना प्रतिनिधित्व मिळण्याची संधी वाढते. शिवाय एका नगरसेवकावर संपूर्ण वॉर्डचा भार राहात नाही.

how many times to press EVM button in municipal election
Prakash Ambedkar on BJP : गौप्यस्फोट! युती फिस्कटण्यामागे नेमकं कारण काय? प्रकाश आंबेडकरांनी थेट भाजपवरच डागली तोफ!

प्रभाग रचनेनुसार निवडणूक होणार असल्यामुळे एका प्रभागात चार उमेदवारांचं पॅनल असेल. त्यामुळे चारही उमेदवारांसाठी स्वतंत्रपणे मतदान करावं लागणार आहे. मतदान केंद्रावर यावेळी किमान दोन आणि कमाल चार ईव्हीएम मशीन असतील. या मशीनवर चार जागांसाठी मतदानाची व्यवस्था केलेली असेल. या जागा अ, ब, क आणि ड अशा नावांनी ओळखल्या जातील. प्रत्येक जागेसाठी वेगळ्या उमेदवारांची यादी असेल.

उमेदवारांच्या संख्येनुसार ईव्हीएमची रचना ठरवली जाईल. काही ठिकाणी चार स्वतंत्र ईव्हीएम असू शकतात, तर काही ठिकाणी दोन मशीनवरच चारही जागांचं विभाजन करण्यात येईल. मतदारांना सोपं जावं यासाठी प्रत्येक जागेसाठी मतपत्रिकांचे रंग वेगवेगळे असतील. अ जागेसाठी पांढरा रंग, ब जागेसाठी गुलाबी रंग, क जागेसाठी पिवळा रंग आणि ड जागेसाठी निळा रंग दिला जाईल. त्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता कमी राहील.

how many times to press EVM button in municipal election
Imtiaz Jaleel News : हल्लेखोर सावे, शिरसाटांचे गुंडे; पोलीसांनी बंदोबस्त करावा, अन्यथा आम्हीही वाकड्यात शिरू! इम्तियाज जलील यांचा इशारा

प्रत्येक ईव्हीएमवर उमेदवाराचं नाव आणि त्याचं निवडणूक चिन्ह स्पष्टपणे दिलेलं असेल. तुम्ही अ जागेसाठी बटन दाबल्यानंतर लाल रंगाचा लाईट लागेल. याचा अर्थ त्या जागेसाठी तुमचं मतदान पूर्ण झालं आहे. त्यानंतर त्याच पद्धतीने ब, क आणि ड जागेसाठी मतदान करावं लागेल.

जर तुम्हाला चारपैकी कोणत्याही उमेदवाराला मत द्यायचं नसेल, तर NOTA म्हणजे ‘नोटा’चा पर्यायही उपलब्ध असेल. शेवटी, ड जागेसाठी मतदान केल्यानंतर ईव्हीएममधून एक बजर वाजेल. हा आवाज म्हणजे तुम्ही चारही जागांसाठी मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे, याची खात्री असणार आहे. म्हणूनच मतदानाच्या दिवशी गोंधळ न होता शांतपणे आणि पूर्ण माहिती घेऊन मतदान करणं प्रत्येक मतदाराचं कर्तव्य आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com