Muncipal Election campaign extension : स्थानिक आघाड्या, अपक्षांना मोठा दिलासा : नगरापालिका, नगरपंचायतीसाठी प्रचाराचे दिवस वाढले

Political News : याआधी 30 नोव्हेंबर 5 पर्यंत प्रचाराची मुदत होती. पण आता त्यामध्ये वाढ करून नगरपालीका व नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी 1 डिसेंबरला रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे.
maharashtra election commission
maharashtra election commissionSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील246 नगरपालिका व 42 नगरपंचायतींच्या सदस्यपदासाठी आणि थेट नगराध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. अवघ्या पाच दिवसावर मतदान आल्याने सर्वत्र प्रचार जोरात सुरु आहे. प्रचाराचा कालावधी संपण्यासाठी चार दिवस हातात होते. मात्र, अपक्षांना बुधवारी चिन्हाचे वाटप करण्यात आले. त्यामुळे प्रचारासाठीचा कालावधी वाढवण्यात आला आहे. याआधी 30 नोव्हेंबर 5 पर्यंत प्रचाराची मुदत होती. पण आता त्यामध्ये वाढ करून नगरपालीका व नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी 1 डिसेंबरला रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे.

निवडणूक आयोगाने गुरुवारी मंगळवारी 2 डिसेंबरला होत असलेल्या मतदानाच्या वेळेत बदल केला होता. त्यानुसार आता 2 डिसेंबरला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ असणार आहे. तर मतमोजणी 3 डिसेंबरला सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर आता नगरपंचायतींच्या निवडणुकीत १ डिसेंबरला सायंकाळी ५ पर्यंत प्रचार करता येणार आहे.

maharashtra election commission
BJP vs Shivsena : '2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे,' म्हणणाऱ्या रवींद्र चव्हाणांना शिंदेंचं प्रत्युत्तर म्हणाले; 'केंद्रात आणि राज्यात...'

नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अपक्ष उमेदवारांना २६ नोव्हेंबरला बुधवारी चिन्हाचे वाटप करण्यात आले. त्यामुळे या उमेदवाराना प्रचारासाठी चार दिवसाचा कालावधी मिळणार होता. त्यामुळे हा प्रचाराचा कालावधी वाढवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. प्रचारासाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली असल्याने सर्वच उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

maharashtra election commission
Ravi Rana BJP Support : ‘स्वबळाची' तलवार म्यान ; 'स्वाभिमान' बाजूला ठेवत रवी राणा पुन्हा ‘भाजप के साथ’

राज्यातील 246 नगरपालिका व 42 नगरपंचायतींच्या सदस्यपदासाठी आणि थेट नगराध्यक्षपदाच्या राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या मतदानासाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली आहे. या निवडणुकांसाठी राज्यभरातुन एकूण 1 कोटी 7 लाख 3 हजार 576 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी सुमारे 13 हजार 355 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

maharashtra election commission
Congress News: '...म्हणून 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला!'; माजी खासदाराच्या दाव्यानं देशाच्या राजकारणात खळबळ

मंगळवारी होत असलेल्या या निवडणुकांसाठी ईव्हीएम मशीनचा व्यवस्था करण्यात आली असून त्यात 13 हजार 726 कंट्रोल युनिट आणि 27 हजार 452 बॅलेट युनिटची उपलब्धता करण्यात आली आहे. सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आता 2 डिसेंबरला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ असणार आहे.

maharashtra election commission
NCP Vs Mahayuti: जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचं कटकारस्थान सांगितले, उरण ईश्वरपूरमध्ये बदनाम करण्याचा डाव

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com