Mahavikas Aaghadi News: निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडीनं घेतला मोठा निर्णय; मनसेच्या एन्ट्रीबाबतही महत्त्वाची अपडेट

Local Body Elections : एकीकडे महायुती आगामी स्थानिक निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू असतानाच महाविकास आघाडीत मात्र अफाट शांतता आहे. काँग्रेस ,उद्धव ठाकरेंची शिवसेना या घटक पक्षांकडून स्वबळाची चाचपणी सुरू आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मात्र आघाडीसाठी जुळवाजुळव सुरू आहे.
Mahavikas Aaghadi.jpg
Mahavikas Aaghadi.jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: महाविकास आघाडीनं महाराष्ट्राच्या राजकारणाचं वारं बदलतानाच लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या मिशन 45 प्लसला मोठा धक्का दिला होता. यात काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं जोरदार मुसंडी मारली होती.

मात्र, लोकसभेच्या यशानंतर अतिआत्मविश्वासात गेलेल्या मविआची विधानसभा निवडणुकीत मोठी दाणादाण उडाली. या धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) अस्तित्वात आहे की नाही इथपर्यंत शंका उपस्थित व्हावी अशी अवस्था झाली. पण स्थानिकच्या निवडणुकीतही स्वबळाचीच चर्चा सुरू असतानाच आता मोठी अपडेट मविआच्या गोटातून आली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण समन्वय बैठक मंगळवारी (ता.11 नोव्हें.) मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडली. या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या तिन्ही घटक पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्र येत स्थानिकच्या निवडणुकांच्या रणनीतीवर चर्चा केली.

याच बैठकीत महाविकास आघाडीनं विधानसभा निवडणुकीनंतर तीन दिशांना तीन तोंड, एकमेकांविषयीची कुरघोडीचं राजकारण,टीका-टिप्पणीमुळे ताणलेले गेलेले संबंध पुन्हा एकदा जुळवून येण्याच्या दृष्टीनं मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Mahavikas Aaghadi.jpg
Eknath Shinde News: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड! संजय राऊतांच्या तब्येतीची काळजी; एकनाथ शिंदेंनी लावला थेट ठाकरेंच्या आमदारालाच फोन

महाविकास आघाडीच्या या बैठकीत अंतर्गत वाद टाळण्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेसकडून खासदार हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुप्रिया सुळे व प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे तर शिवसेना (उद्धव गट) कडून खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब उपस्थित होते.

मविआच्या बैठकीनंतर प्रमुख नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची (Local Body Elections) तयारी हाच मुख्य अजेंडा असल्याचं स्पष्ट मत व्यक्त केलं. राज्यभरातील उमेदवारी, मतदारसंघ वाटप, आणि जिल्हास्तरीय समन्वय समित्या या विषयांवर सखोल चर्चा या बैठकीत करण्यात आल्याचंही नेत्यांनी सांगितलं. झाली.

Mahavikas Aaghadi.jpg
Rupali Thombre News : अजितदादांनी हकालपट्टी केल्यानंतरही रुपाली ठोंबरेंचा कॉन्फिडन्स कायम: आरक्षण जाहीर होताच तीन प्रभागांवर दावा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार सर्व जिल्हाध्यक्षांना देण्यात आल्याची माहिती यावेळी दिली. यावेळी काही पेच निर्माण झाल्यास तिथे समन्वयक समिती काम करणार असल्याचंही शिंदेंनी सांगितलं. यानंतर महाविकास आघाडीची स्थानिकच्या निवडणुकांवर चर्चा करण्यासाठी 17 तारखेनंतर पुन्हा बैठक होणार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा एकदा मनसेसोबतच्या युतीबाबत मोठं विधान केलं. ते म्हणाले, अजून मनसेबाबतचा कोणताही अधिकृत प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. प्रस्ताव आल्यावरच चर्चा होईल. महाविकास आघाडी म्हणून आम्ही दोन निवडणुका एकत्र लढलो असून, समान विचार असणारे पक्ष एकत्र राहावेत ही आमची भूमिका आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com