Bhandara Assembly Election: भंडारा जिल्ह्यातील लढतीत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा लागणार कस ?

Political News: गेल्या काही दिवसात राजकीय समीकरण बदलली आहेत. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर होत असलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.
Narendra Bhondekar, Nana Patole, Raju Karmore
Narendra Bhondekar, Nana Patole, Raju KarmoreSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भंडारा जिल्ह्याची ओळख बड्या नेतेमंडळींचा जिल्हा अशी आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल अशा नेतेमंडळींचा हा जिल्हा राहिला आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच भंडारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या काही दिवसात राजकीय समीकरण बदलली आहेत. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर होत असलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.

भंडारा जिल्ह्यात साकोली, भंडारा आणि तुमसर असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. या तिन्ही विधानसभा क्षेत्रात साकोली काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भंडाऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिलेदार शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर तर तुमसरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे हे आमदार आहेत. (Bhandara Assembly Election News)

आगामी निवडणुकीत या तिन्ही मतदारसंघातील निवडणुका अत्यंत चुरशीची होणार असून सर्वाधिक हाय व्होल्टेज ड्रामा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या साकोली येथे बघायला मिळणार आहेत. एकंदरीतच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भंडारा जिल्ह्याचे असल्याने या जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्रात तिन्ही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्याची मोठी जबाबदारी नाना पटोलेंवर आहे.

भंडारा-गोंदिया हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे भंडाऱ्याची ओळख देश पातळीवरच्या राजकारणात आहे. भंडारा जिल्ह्यात तीन विधानसभा क्षेत्र तर गोंदिया जिल्ह्यात चार विधानसभा क्षेत्र आहेत. त्यामुळे येथील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भंडारा जिल्ह्यातील पक्षीय बलाबल

भंडारामध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. तर साकोली मतदार संघात काँग्रेसचे तर तुमसर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत.

मतदारसंघ व आमदार

भंडारा - नरेंद्र भोंडेकर (शिवसेना शिंदे गट)

साकोली - नाना पटोले (काँग्रेस)

तुमसर - राजू कारेमोरे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)

Narendra Bhondekar, Nana Patole, Raju Karmore
Eknath Khadse News : एकनाथ खडसे 'या' कारणामुळे जाणार नाहीत जळगावमधील पीएम मोदींच्या कार्यक्रमास

2019 च्या विधानसभा निवडणुकीत काय झालं होतं?

भंडारा विधानसभा मतदारसंघ :

भंडारा विधानसभा क्षेत्र हा अनुसूचित जातीकरिता आरक्षित आहे. या ठिकाणी 2019 साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे आघाडीतील दोन्ही पक्ष एकत्र लढले होते. शिवसेना, भाजप हे महायुतीमधील पक्ष एकत्र लढले होते. . 2019 च्या लढतीमध्ये अपक्ष नरेंद्र भोंडेकरांनी 1,01,717 मते मिळवली होती. त्यांनी भाजपच्या अरविंद मनोहर भालाधारे यांचा पराभव केला होता. याठिकाणी अपक्ष म्हणून निवडून आलेले नरेंद्र भोंडेकर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत. त्यामुळे या जागेवर पुन्हा एकदा नरेंद्र भोंडेकर आगामी विधानसभा शिवसेनेकडून लढतील हे निश्चित मानले जात आहे.

आता याठिकाणी महाविकास आघाडीत ही जागा कोणत्या पक्षाला मिळणार यावरून उमेदवार अवलंबून असणार आहे. यासोबतच काँग्रेसमध्येही अनेक इच्छुक आहेत. सोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडूनही अनेकांनी उमेदवारीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. काँग्रेसमध्येही इच्छुकांची संख्या मोठी असल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कदाचित स्वकियांची डोकेदुखी आपल्या पाठीमागे वाढवून घेणार नाहीत. त्यामुळेच ही जागा ठाकरे गटाला सोडून येथे महाविकास आघाडीच्या माध्यमातून भोंडेकरांना पाडण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याची चर्चा आहे.

Narendra Bhondekar, Nana Patole, Raju Karmore
Shivsena News : मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का! आणखी एक महिला नेत्या शिंदे गटात प्रवेश करणार

साकोली विधानसभा मतदारसंघ

साकोली विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले करीत आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांना भाजपकडून परिणय फुके यांनी अत्यंत निकराची झुंज दिली होती. 2019 च्या निवडणुकीत भाजपकडून परिणय फुके आणि काँग्रेसचे नाना पटोले यांच्यात थेट लढत झाली होती. या निवडणुकीत नाना पटोलेंनी 95,208 मिळवत विजय मिळवला. भाजपच्या परिणय फुके यांचा त्यांनी 6,240 मतांनी पराभव केला होता.

याठिकाणी वंचितकडून काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये यांनी दिलेली लढतही लक्षवेधी ठरली होती. अटीतटीच्या लढतीत नाना पटोले यांनी भाजपचे परिणय फुके यांचा पराभव केला होता. यावेळेस महाविकास आघाडीकडून पुन्हा नाना पटोले रिंगणात उतरणार आहेत तर महायुतीकडून कोण उमेदवार असणार याची उत्सुकता लागली आहे.

Narendra Bhondekar, Nana Patole, Raju Karmore
MVA News : मविआत तिढा, नवाब मलिकांच्या विरोधात कोण उमेदवार असणार? ठाकरे गटाची मोठा मतदारसंघ सोडण्याची तयारी

तुमसर विधानसभा मतदारसंघ

तुमसर विधानसभेचे आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आहेत. राजू कारेमोरे सध्या तुमसर विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष निवडणूक लढणारे भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांचा 7,700 पराभव केला होता. या निवडणुकीत राजू कारेमोरे यांना 87,190 मते मिळाली होती.

या निवडणुकीत महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस असल्याने ही जागा पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या कोट्यात येणार असून याठिकाणी राजू कारेमोरे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. याठिकाणी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांनीही दावेदारी केली असून काँग्रेसच्याही अनेक नेत्यांनी उमेदवारी मिळावी यासाठी मागील काही दिवसांपासून विधानसभा क्षेत्रात मतदारांपर्यंत पोहोचून काँग्रेसचा अजेंडा समजविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

या क्षेत्रात इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्यास मोठ्या प्रमाणात बंडखोरीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तुमसर विधानसभा क्षेत्राचे आमदार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे असल्याने त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी प्रफुल्ल पटेल यांच्या खांद्यावर राहणार आहे. त्यामुळे साकोली, भंडारा आणि तुमसर या विधानसभा क्षेत्रात चुरशीची लढत होणार आहे.

Narendra Bhondekar, Nana Patole, Raju Karmore
MVA News : 'मुंबईत शिवसेना ठाकरे गटच मोठा भाऊ', मविआच्या बैठकीनंतर शरद पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान, काँग्रेसला डिवचलं?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com