Ashok Gehalot : महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला फायनल; ठाकरे, गेहलोत भेटीत शिक्कामोर्तब?

Political News : महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात
uddhav thackrey, Ashok gehlot
uddhav thackrey, Ashok gehlot
Published on
Updated on

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. महायुती व महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असली तरी घोषणेसाठी फेब्रुवारी महिना उजाडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच शुक्रवारी महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला फायनल झाली असल्याची चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटप अंतिम टप्प्यात असताना चार जागावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व शिवसेना ठाकरे गटात एकमत होत नसल्याने गेल्या काही दिवसापासून चर्चा रखडली होती. त्यामुळे शुक्रवारी मातोश्रीवर जाऊन राजस्थानचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते अशोक गेहलोत (Ashok gehlot) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav thackrey) यांची भेट घेऊन चर्चा केली.

uddhav thackrey, Ashok gehlot
Narendra Modi : भाजपमध्ये इतरांना नियम, मोदींसाठी मात्र नाही...! पक्षांतर्गत लोकशाहीची ऐशीतैशी

या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत प्रामुख्याने रखडलेल्या या चार जागांवर दोन्ही नेत्यांमध्ये महत्वपूर्ण चर्चा झाली. त्यासोबतच ऑनलाइन मीटिंगमध्ये उद्धव ठाकरे सहभागी झाले नसल्याने त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न गेहलोत यांनी केला असल्याचे समजते.

या भेटीनंतर काँग्रेस अथवा शिवसेना ठाकरे गटाकडून कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही. यावेळी दोन्ही नेत्यात चर्चा झाली असून सूत्राने दिलेल्या माहितीनुसार ज्या चार जागांवर आघाडीचे घोडे अडले होते, त्यावर चर्चेअंती तोडगा निघाला असल्याचे समजते. त्यामुळे आता लवकरच इंडिया आघाडीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब होईल, अशी चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, 2024 लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यामध्ये चर्चा सुरु आहे. इंडिया आघाडीसाठी महाराष्ट्र हे महत्वाचं राज्य आहे. काँग्रसने महाराष्ट्रात ताकद वाढवण्यासाठी तयारीही सुरु केली आहे.

काँग्रेसनं स्थपना दिवस नागपूरमध्ये केला. तर भारत न्याय यात्राचा समारोप मुंबईमध्ये होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी लोकसभासाठी 23 जागांची मागणी केली होती. काँग्रेसच्या नेत्यांनी ही मागणी फेटाळली. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनीही महाविकास आघाडीत पक्षांमध्ये एकीची गरज असल्याचं सांगितलं. त्याशिवाय शिवसनेची सध्याची मागणी खूप जास्त असल्याचे म्हटले होते.

uddhav thackrey, Ashok gehlot
Ashok Gehlot News: राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दिशेने भिरकावला माईक?; व्हिडिओ व्हायरल

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com