MVA Seat Shairing News : 'जवळपास सगळे ठरलंय; आता फक्त...'; महाविकास आघाडीच्या जागावाटपावर राऊतांचा मोठा दावा

MVA News : महाविकास आघाडीची जागावाटपाबाबत मुंबईत प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली.
Nana Patole, Sharad Pawar, Uddhav Thackeray, Prakash Ambedkar
Nana Patole, Sharad Pawar, Uddhav Thackeray, Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक पार पडली. या वेळी राज्यातील ४८ जागासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. जागावाटपाबाबत महाविकास आघाडीतील घटक पक्षांत कसलेच मतभेद नाहीत. या वेळी उत्तम आणि सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीत जवळपास सगळे ठरलंय, असा दावा ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी बैठकीनंतर केला .

महाविकास आघाडीच्या काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट व  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार व वंचित आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडीची पुढील रणनीती ठरली आहे. त्यासोबतच वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना हव्या असलेल्या लोकसभेच्या जागांची यादी या वेळी दिली. त्यावर बैठकीत सर्वच नेत्यांनी चर्चा केली. (Lok Sabha Election MVA Seat Sharing News)

Nana Patole, Sharad Pawar, Uddhav Thackeray, Prakash Ambedkar
Pune Lok Sabha Election 2024 : धंगेकर, मोहन जोशी, अरविंद शिंदेंच्या वाटेत आबा बागुलांनी टाकले काटे...

येत्या ९ मार्च रोजी पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील घटक पक्षांची बैठक होणार आहे. त्यामध्ये जागावाटपाबाबत अंतिम चर्चा होणार असून, त्यानंतर जागावाटपाची घोषणा करण्यात येईल, असेही या वेळी बोलताना संजय राऊत यांनी स्पष्ट केले. चर्चा अंतिम टप्प्यात असून, त्यावर निर्णय झाल्यानंतर लगेचच जागावाटपाची घोषणा करण्यात येणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीच्या या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad pawar), ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav thackeray), काँग्रेसचे नाना पटोले, बाळासाहेब राऊत व वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यासह संजय राऊत (Sanjay Raut), जितेंद्र आव्हाड या बैठकीस उपस्थित होते.

R

Nana Patole, Sharad Pawar, Uddhav Thackeray, Prakash Ambedkar
Sharad Pawar Called Meeting MVA : शरद पवारांनी पुन्हा टायमिंग साधलं; महाविकास आघाडीची बोलावली बैठक

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com