MVA News : 'मविआ'तील लहान घटक पक्षाने केला विधानसभेसाठी इतक्या जागांवर दावा

Political News : जागावाटपासाठी आघाडीची बैठक 8 ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे या बैठकीत लहान पक्षांच्या मागणीकडे कशापद्धतीने लक्ष घालणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे.
Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray
Sharad Pawar, Nana Patole, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत जागावाटप करताना महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या लहान घटक पक्षांना जागा देण्यात आली नव्हती. त्यामुळे आता आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच लहान घटक पक्ष खडबडून जागे झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्षाकडे जागांची मागणी केली आहे.

महाविकास आघाडीच्या (MVA) जागावाटपावरून चर्चा सुरु आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाने 11 जागा तर समाजवादी पक्षाने 12 जागेंची मागणी केली आहे. त्याचबरोबर लहान मोठे पक्ष संघटनेने जवळपास एकूण 40 च्या आसपास जागांची मागणी आघाडीकडे केली आहे. (MVA News)

जागावाटपासाठी आघाडीची बैठक 8 ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे या बैठकीत लहान पक्षांच्या मागणीकडे कशापद्धतीने लक्ष घालणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे.

यावेळी डावे पक्ष, समाजवादी पक्षाने (SP) जागांची मागणी केली आहे. या मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाने 11 जागा तर समाजवादी पक्षाने 12 जागा मागितल्या आहेत. त्याचबरोबर लहान मोठे पक्ष संघटनेनी मिळून सुमारे 40 च्या आसपास जागांची मागणी केली आहे.

Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray
Amol Kolhe News : लक्षात ठेवा वेळ तुमची असेल तर येणारा काळ आमचाच; अमोल कोल्हेंनी दिला इशारा

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत लहान घटक पक्षाला जागा देण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे आता या लहान घटक पक्षाने जागा मागितल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात आता जागावाटपात महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या वाट्याला किती जागा मिळणार? याची उत्सुकता लागले आहे.

Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray
Jayant Patil News : जयंत पाटलांचे मोठं विधान; म्हणाले, 'चंदगडमध्ये नवा चेहरा...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com