Nawab Malik News : अजित पवारांचा नवाब मलिकांना 'स्वागता'साठी फोन...

Nagapur Winter Session : मलिक स्वत:चा निर्णय घेण्यास खंबीर आहेत.
Ajit Pawar, Nawab Malik
Ajit Pawar, Nawab Maliksarkarnama
Published on
Updated on

Nawab Malik News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवाब मलिक यांना फोन केल्याच्या चर्चा विधिमंडळात रंगल्या होत्या. अजित पवारांनी नवाब मलिकांना फोन केल्यासंदर्भात नवाब मलिक हे स्वत:चा निर्णय घेण्यास खंबीर आहेत, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

नवाब मलिकांना Nawab Malik तुम्ही फोन केला होता का? आणि ते आता कुठल्या गटाबरोबर बसणार? या प्रश्नावर अजित पवार Ajit Pawar म्हणाले, ” तुम्हाला काय करायचे आहे? नवाब मलिक आमदार आहेत. ते स्वत:चा निर्णय घेण्यास खंबीर आहेत. आतमध्ये कोणी कुठे बसायचे हा संपूर्ण अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा आहे.

Ajit Pawar, Nawab Malik
Maratha Reservation : एकदा मराठा आरक्षण मिळू द्या; भुजबळांचा कार्यक्रमच करतो...

मधल्या काळात ज्या काही घटना घडल्या, त्या तुम्हाला माहिती आहेत. मी त्यांना नागपूरमध्ये त्यांचे स्वागत आहे म्हणून फोन केला होता.” विधानसभेत आल्यानंतर नवाब मलिक नेमके कोणत्या बाकावर बसतात, याबद्दल दोन्ही गटांमध्ये कमालीची उत्सुकता होती. ते कुठल्या बाकावर बसणार, याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. राष्ट्रवादीतील दोन्हीही गट नवाब मलिक आपल्या गटात बसावेत, यासाठी प्रयत्नशील होते.

मात्र, मलिकांनी अजित पवार गटात जाणे पसंत केले आहे. देवेंद्र फडणवीसांनी मलिकांना देशद्रोही ठरवलं होते. तेच मलिक आता सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले आहेत, यावरून ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी फडणवीसांना धारेवर धरले. विधिमंडळात जाण्याआधी नवाब मलिक हे अजित पवारांना भेटले, तर त्याआधी त्यांनी शरद पवार यांचीही भेट घेतल्याचे समजते.

Edited By : Amol Sutar

Ajit Pawar, Nawab Malik
Winter Session 2023: 'देशद्रोही' तुम्हाला इतके प्रिय कसे ? 'नवाबी थाटात' मांडीला मांडी लावून बसले; दानवे संतापले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com