Maratha Reservation : एकदा मराठा आरक्षण मिळू द्या; भुजबळांचा कार्यक्रमच करतो...

Chhagan Bhujbal : यवतमाळच्या उमरखेडमधील सभेत मनोज जरांगेंची जीभ पुन्हा घसरली.
Manoj Jarange
Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Yavatmal News : राज्यात छगन भुजबळ यांच्यासारखा दुसरा कलंकित मंत्री असूच शकत नाही. मराठा समाजाला एकदा आरक्षण मिळू द्या, त्यानंतर मी त्यांचा कार्यक्रमच करतो, असा रोखठोक इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. ते यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडमध्ये आयोजित सभेत बोलत होते.

सभेला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील Manoj jarange Patil यांनी नमूद केलं की, इतका छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांच्यासारखा उच्च दर्जाचा मंत्री, एक पुढारी सामान्य गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना मिळणाऱ्या आरक्षणात आडवा येतो. आरक्षणात आडवे जाणाऱ्यांचे टेन्शन कुणी घेऊ नये. त्याला आपण एकटेच खंबीरपणे पुरेसे आहोत, मराठा समाजाने विश्वास ठेवावा. गेल्या काही दिवसांपासून भुजबळ आणि जरांगे यांच्यात संघर्ष सुरू आहे.

Manoj Jarange
BJP Politics : डरकाळीच नव्हे, हल्लाही करतो; हे दाखवून देण्याची 'सिंहा'ला संधी; माढा लोकसभेसाठी भाजपचं ठरलं...

ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि महायुती सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आरक्षणावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. ओबीसी एल्गार सभेतदेखील भुजबळ यांनी जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर राज्यभरातील मराठा संघटनांकडून भुजबळ यांना विरोध होत आहे.

विदर्भातील अकोला जिल्ह्यात असलेल्या चरणगावमध्ये आयोजित सभेदरम्यानही मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांनाच टार्गेट केले होते. महाराष्ट्रात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या सभांमधून आतापर्यंत जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावरच प्रहार कायम ठेवला आहे. मात्र, यवतमाळ Yavatmal जिल्ह्यातील सभेत त्यांनी आरक्षण मिळाल्यानंतर भुजबळ यांच्या कार्यक्रमाच करण्याचा इशारा दिला आहे.

त्यामुळे जरांगे पाटील यांच्या पाठीशी भुजबळ यांना संपवण्यासाठी कोण उभं आहे, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यातील शाब्दिक वाद आता एकेरी भाषेपर्यंत आला आहे. दोघेही आपल्या भाषणांमधून एकमेकांचा उल्लेख एकेरी करत असल्याने हा वाद आता अधिक विकोपाला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच मराठा समाजाकडून छगन भुजबळ यांना होणारा विरोध सातत्याने वाढत आहे.

Manoj Jarange
Sugarcane FRP News: 'स्वाभिमानी' पुन्हा रोखणार पुणे-बंगळुरू महामार्ग ? आता सांगलीतील कारखानदार रडारवर

कोणत्याही स्वरूपात हिंसक आंदोलन करू नका. छगन भुजबळ यांच्या नादी लागू नका, असा आवाहन मनोज जरंगे प्रत्येक सभेमधून करीत आहेत. अकोल्यानंतर उमरखेडच्या सभेतही त्यांनी हे आवाहन केलं. त्यातूनच त्यांनी छगन भुजबळ यांना पाहून घेऊ असं सांगितलं. मनोज जरांगे पाटील यांची आता हिंगोलीत सभा पार पडणार आहे.

हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस फाट्यावर या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये हिंगोलीच्या रामलीला मैदानावर ओबीसींची सभा झाली होती. त्यानंतर आता जरांगे यांची सभा होणार असल्याने या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By : Amol Sutar

Manoj Jarange
Congress : काँग्रेस आमदाराने राजभवनासमोरच तोंडाला फासले काळे; भाजपला दिले होते ओपन चॅलेंज

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com