Nagpur constituency 2024 : भाजपची चिंता वाढली; गडकरींना किरकोळ लीड, दिग्गज नेतेही बॅकफुटवर

Bjp Politics News : महाराष्ट्रातील भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी केवळ 850 मतांनी आघाडीवर होते. त्यामुळे भाजपच्या गोटात चिंता पसरली होती.
Nitin Gadkari News Lok Sabha Election 2024:
Nitin Gadkari News Lok Sabha Election 2024:Sarkarnama

Nitin Gadkari vs Vikas Thackeray News : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला मंगळवारी सुरुवात झाली. सुरुवातीच्या कलात भाजपची चिंता वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातून 6000 मतांनी पिछाडीवर असल्याचे वृत्त आले आणि भाजप नेते, कार्यकर्ते, समर्थकांना धक्का बसला.

हा धक्का पचवायच्या आतच आणखी एक धक्कादायक बातमी महाराष्ट्रातून आली. महाराष्ट्रातील भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी केवळ 850 मतांनी आघाडीवर होते. त्यामुळे भाजपच्या (Bjp) गोटात चिंता पसरली होती.

नागपूर लोकसभा मतदारसंघात नितीन गडकरी आणि काँग्रेसचे विकास ठाकरे अशी लढत आहे. सुरवातीला नितीन गडकरी यांना चांगली आघाडी होती, मात्र ती नंतर 850 मतांवर आली. त्यामुळे भाजपच्या गोटात चिंता पसरली. हे चित्र पुढच्या फेऱ्यांमध्ये नक्की बदलेल, अशी आशा भाजपला आहे.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार (Bharti Pawar) याही पिछाडीवर पडल्या होत्या. कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाचा फटका भारती पवार यांना बसतो की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. चंद्रपूर मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवर पिछाडीवर असून प्रतिभा धानोरकर यांनी आघाडी घेतली आहे.

Nitin Gadkari News Lok Sabha Election 2024:
Nashik constituency 2024: नाशिकमध्ये ठाकरेंचे वाजे, दिंडोरीत शरद पवार गटांचे भगरे जोरात !

तिकडे, मराठवाड्यातही भाजपला धक्का बसताना दिसत आहे, लातूरचे खासदार सुधार श्रृंगारे हेही पिछाडीवर पडले आहेत. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बीड मतदारसंघातही भाजपच्या पंकजा मुंडे (Pankja Munde) पिछाडीवर होत्या.

(Edited By : Sachin Waghmare)

Nitin Gadkari News Lok Sabha Election 2024:
Lok Sabha Election 2024 Result : मोदी 350+, राहुल गांधींच्या ‘हाता’ची घडी; पुन्हा भाजपराज?

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com