
Nagpur News, 17 Dec : विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या घवघवीत यशाला लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana ) कारणीभूत ठरली आहे. या योजनेमुळेच आमच्या विजयाचा मार्ग सोपा झाल्याची जाहीर कबुली युतीच्या नेत्यांनी दिली आहे.
मात्र, नवीन सरकारचा शपथविधी होताच 'निकषाच्या बाहेर कोणी असेल किंवा तशा तक्रारी आल्या तर पुनर्विचार केला जाईल.' असं खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितलं. फडणवीसांच्या या घोषणेमुळे अनेक बहिणींचं टेन्शन वाढलं शिवाय आता या योजनेचे निकष बदलले जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
याच मुद्द्यावरून आता शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.शिवाय कोणतेही निकष न बदलता निवडणुकीआधी लाडक्या बहिणींच्या खात्यात ज्याप्रमाणे पैसे जमा केले त्याप्रमाणे लवकरात लवकर सर्व महिन्यांचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करा, असं ठाकरेंनी म्हटलं आहे.
ते नागपूर (Nagpur) येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्धव ठाकरे हिवाळी अधिवेशनासाठी आज नागपुरात आले होते. सभागृहात उपस्थिती लावल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत महायुती सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवरुन त्यांनी सरकारला धारेवर धरलं.
निवडणुकीआधी ज्याप्रमाणे कोणतेही निकष न लावता लाडकी बहीण योजनेचे पैसे माता-भगिनींच्या खात्यात जमा केले तसेच आताही करा, असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "सध्या लाडक्या बहिणींपेक्षा लाडके आमदार ज्यांना मंत्रिपदं मिळाली असे आवडते आणि नावडते आमदार अशीच चर्चा जास्त रंगली आहे.
लाडक्या बहिणींच्या खात्यात पहिल्या 5 महिन्यांचे साडेसात हजार रुपये जमा झाले आहेत. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या (Election Commission) माध्यमातून या योजनेचे पुढेचे पैसे वाटायला लागू नयेत म्हणून या योजनेवर स्थिगिती आणली," असा आरोप ठाकरेंनी केला. दरम्यान, आता निवडणूक झाली असून आचारसंहिता संपली आहे.
त्यामुळे निवडणुकीच्या आधी ज्या प्रकारे महिलांची मते मिळवण्यासाठी योजना आणली आणि त्यांच्या खात्यात पैसे जमा केले त्याच पद्धतीने आता तात्काळ पैसे जमा करा. 1500 नव्हे तर महायुतीने सांगितल्याप्रमाणे 2100 रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले पाहिजेत. शिवाय यात काही आवडती-नावडती बहीण न करता, कोणतेही निकष न लावता खात्यात पैसे जमा झाले पाहिजेत, असं ठाकरे यावेळी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.