Nagpur factory blast : नागपूर स्फोटाने हादरले! 17 जणांच्या मृत्यूंनंतर सीएम फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; उच्चस्तरीय चौकशीसह दिले 'हे' महत्त्वाचे आदेश!

Political News : या अपघातानंतर सीएम देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीसह महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis
Maharashtra Chief Minister Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथील एक्सप्लोसिव्ह या स्फोटके तयार करणाऱ्या फॅक्टरीत मोठा स्फोट झाला. ही घटना रविवारी सकाळी घडली. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर 18 जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. या दुर्घटनेतील जखमींना तातडीने उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या अपघातानंतर सीएम देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीसह महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस (Devendra fadnavis) यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून, या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना पाच लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकार करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विट द्वारे माहिती दिली की, ते स्थानिक प्रशासनाच्या सतत संपर्कात आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी तळ ठोकून आहेत. NDRF आणि SDRF ची पथके तातडीने मदतकार्यासाठी पोहोचली आहेत.

Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis
BJP Rajya Sabha Election: अमित शहांचा रवींद्र चव्हाणांसाठी नवा आदेश, राज्यसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट, महायुती 6 नाही,तर 7 जागा लढवणार?

'पेसो'आणि 'डिश'या तांत्रिक तपासणी करणाऱ्या विभागांची पथकेही घटनास्थळी दाखल झाली असून स्फोटाचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू झाले आहे. या भीषण दुर्घटनेत १८ जण जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis
Shivsena UBT News : आधी नगरसेवक होईन, मगच लग्न; उद्धव ठाकरेंचा शिलेदाराला फोन, आता चांगली मुलगी बघ!

या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपयांची तर जखमींना योग्य मदतीचे आदेश दिले आहेत. याव्यतिरिक्त पीएमओकडून 2 लाख आणि कंपनीकडून वेगळी मदत मिळणार आहे. जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. जखमी झालेल्या 18 कामगारांना नागपूरच्या शासकीय रुग्णालयात तातडीने हलवून त्यांच्यावर सर्वोत्तम आणि मोफत उपचार करण्याचे आदेश प्रशासनाला सीएम फडणवीस यांनी दिले आहेत.

Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis
Junnar Panchyat Samiti: जुन्नरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची मोठी खेळी; एका मतासाठी थेट उपसभापतीपदाची ऑफर; NCP नेही प्लॅन बदलला

सीएम फडणवीस यांनी दिले चौकशीचे आदेश

"राऊळगाव येथील स्फोटाची घटना दुर्दैवी आणि दुःखद आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत," अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या. तसेच, ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली आणि यात कोणाचा निष्काळजीपणा आहे का, याची सखोल चौकशी करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis
Pune Congress : पुण्यात दारूण पराभवानंतर काँग्रेस अ‍ॅक्शन मोडमध्ये; 'मास्टरप्लॅन' तयार!दौंड, इंदापूर, बारामती टार्गेटवर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com