Nagpur Violence : नागपूर दंगलीच्या तपासात हादरवून टाकणारी माहिती उघड; हिंसाचारात बांग्लादेश कनेक्शन?

Fahim Khan : नागपूरमध्ये सोमवारी (ता.17) रात्री मोठा हिंसाचार उसळला. हा हिंसाचार औरंगजेबाच्या कबरीवरून उसळला. ज्यात दोन गटात राडा झाला. ज्यानंतर दगडफेक आणि जाळपोळ झाली. तर पोलिसांनी या प्रकरणात फहीम खान मास्टरमाइंड असल्याप्रकरणी त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.
Nagpur Violence
Nagpur Violencesarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : नागपूरमध्ये सोमवारी (ता.17) रात्री मोठा हिंसाचार उसळला. औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीवर केलेल्या आंदोलानाचे कारण या दंगलीला ठरले आहे. या दंगलीत दोन जमावात मोठा राडा झाला. ज्यात वाहनांची तोडफोड, दगडफेक करण्यासह जाळपोळ करण्यात आली. या दंगलीत काही नागरींकासह पोलिसही जखमी झाले. तर एका IPS अधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आला. तर एका महिला पोलिसांचा विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यादरम्यान आता आता आणखी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या दंगलीत बांग्लादेश कनेक्शन असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तर हा संशय या दंगलीचा मास्टरमाइंड असणाऱ्या फहीम खान यांच्याकडील काही व्हिडिओवरून व्यक्त केला जातोय.

औरंगजेबाच्या कबरीवरुन राज्यभर असंतोष समोर येत आहे. हिंदुत्ववादी संघटनांची मागणी ही कबर हटवण्याची आहे. तर यावरून राज्य सरकारला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने इशारा दिला होता. तसेच कार सेवा करून कबर हटवू असे सांगण्यात आले होते. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी केलेल्या आंदोलनावरून अफवा पसरवण्यात आली. आंदोलनादरम्यान मुस्लिम मजकूर असणारी चादर जाळण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावरूनच वाद उसळला आणि दंगल पेटल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात दिली. तर या प्रकरणात फहीम खान मास्टरमाइंड असून त्याच्यावर पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केल्याचंही फडणवीस यांनी सांगितले होते.

यादरम्यान आता पोलिसांनी केलेल्या तपासातून हादरवून टाकणारी माहिती उघड झाली असून अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. जे हिंसाचाराला कारणीभूत ठरले होते. आता पोलिस याचाच तपास करत असून ते कुठून आले? कुठल्या देशाच कनेक्शन आहे. हे तपासले जात आहे. यावेळी नागपूर राडा प्रकरणात बांग्लादेशातील दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे आता समोर आले आहे.

Nagpur Violence
RSS ON Nagpur Violence: "आम्ही कुठल्याही हिंसेचे समर्थन करत नाही; RSSने विहिंपचे कान उपटले

नागपूर हिंसाचाराला कारणीभूत ठरलेले काही व्हिडिओ इतर देशातून आल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी तब्बल 172 व्हिडिओ तपासले असून ते हिंसाचार भडकवणारे असल्याचे उघड झाले आहे. तर अधिक तपासात IP अड्रेसवरुन हे व्हिडिओ बांग्लादेश आणि इतर देशातून व्हायरल करण्यात आले आहेत. सध्या पोलिस या IP अड्रेस असणाऱ्या मोबाइल शोध घेत आहेत.

फहीम खाने मालेगाव कनेक्शन?

नागपूरच्या दंगलीचा मास्टर माईंड फहीम खानचे मालेगाव कनेक्शनही समोर आले असून तो पाच महिन्यांपूर्वी मालगावला गेला होता. यासंदर्भातील त्याचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. दरम्यान मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन विधानसभा निवडणूक वेळी केले होते. त्यावेळी त्याच्या मायनॉरिटी डेमोक्रेटिक पक्षाच्या तिकीटावर मोहम्मद फरान शकील अहमद यांनी निवडणूक लढवली होती.

Nagpur Violence
Nagpur Violence : संतापजनक! नागपूर हिंसाचारात महिला पोलिसाचा विनयभंग? शिवीगाळ, अश्लील शेरेबाजी अन् वर्दीवर हातही टाकला

संचारबंदी लागू, शाळा बंद

नागपूरच्या महाल भागात सोमवारी दोन गटांमध्ये राडा होऊन दंगल उसळली. ज्यात तुफान दगडफेक झाली, वाहनांची तोडफोड करण्यात आली. तसेच काही वाहने जाळण्यात आली. यानंतर पोलिसांनी अश्रुधूराच्या नळकांड्या फोडत जमावाला पांगवले. तर , अग्निशमन दलाचे जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. सध्या नागपूरच्या काही भागात संचारबंदी लागू करण्यात आली असून ती अद्याप कायम आहे. तर शाळा बंद आहेत.

फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा

या हिंसाचारप्रकरणी फहीम खान याला पोलिसांनी अटक केली असून तोच याच दंगली मागच्या मास्टरमाईंड असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्याच्यासह 50 आरोपींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता तपास सुरू असून अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com