Nagpur Winter Session : मंत्री तानाजी सावंत करणार सोलापूरच्या आरोग्य विभागाचे 'ऑपरेशन'; झाडाझडती घेणार

Maharashtra Political News : आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत हे लवकरच सोलापूर जिल्ह्याचा दौरा करून आरोग्य विभागाची झाडाझडती घेणार आहेत.
Tanaji Sawant, Ram Satpute
Tanaji Sawant, Ram SatputeSarakarnama
Published on
Updated on

Political News : हिवाळी अधिवेशन पार पडताच आठवडाभरात आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत हे सोलापूर जिल्ह्याचा दौरा करून आरोग्य विभागाची झाडाझडती घेणार आहेत. माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना सोबत घेऊन सावंत हा दौरा करणार असून, या दौऱ्यात सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या समस्या जाणून घेणार असल्याचे मंत्री सावंत यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार राम सातपुते यांनी सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासंदर्भात लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी आरोग्यमंत्री सावंत यांनी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार असल्याचे स्पष्ट केले.

माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते यांनी अधिवेशनात सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेच्या समस्या, आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता आणि नोकर भरती करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. आमदार सातपुते म्हणाले की, आरोग्याचा प्रश्न हा ग्रामीण महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे.

Tanaji Sawant, Ram Satpute
MLA Sanjay Shinde : 'अजित पवार हेच माझं सरकार' म्हणणाऱ्या संजयमामांना मतदारसंघासाठी निधींची लॉटरी

सोलापूर जिल्हा रुग्णालयामध्ये सध्या सिटीस्कॅन मशीन उपलब्ध नाही. त्यामुळे गोरगरीब जनतेला खासगी रुग्णालयात जाऊन 5 ते 10 हजार रुपये खर्च करावे लागत आहेत. तसेच अकलूज येथील जिल्हा उपरुग्णालयामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. तिथे सफाई कामगार, एक्सरे मशीन ऑपरेटर, आरोग्य सेविकांची कमतरता आहे. त्यामुळे शासनाकडून आरोग्य विभागात तातडीने कर्मचारी भरती करण्याची विनंतीही सातपुते यांनी केली.

स्ट्रक्चरल ऑडिट अन् दौरा

या वेळी राम सातपुते (Ram Satpute) यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्वच शासकीय रुग्णालयाचे आरोग्य विभागाच्या वतीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली. जिल्ह्यातील अनेक रुग्णालयांत रुग्णासाठी सोयी सुविधांचा अभाव आहे. आरोग्यमंत्री हे सोलापूर जि्ल्ह्यातूनच येतात. त्यामुळे त्यांनी विशेष लक्ष देऊन स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली. यावर उत्तरादाखल आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji sawant) यांनी अधिवेशन संपताच आमदार सातपुते यांच्यासोबत बैठक घेऊन आरोग्य विभागाच्या समस्यांवर चर्चा केली जाईल. तसेच त्यांना सोबत घेऊन 8-10 दिवस संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करत प्राथमिक आरोग्य केंद्रापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत पाहणी करून ज्या ज्या ठिकाणी आरोग्य सोयी सु्विधांचा तुटवडा असेल, त्या ठिकाणी त्या सुविधा दोन महिन्यांत उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन सावंत यांनी दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संजय राऊतांवर निशाणा

दरम्यान, या वेळी आमदार सातपुते यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर कोरोना काळातील नोकर भरती प्रकरणावरून निशाणा साधला आहे. राम सातपुते म्हणाले, की आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनात सरकारकडून पारदर्शक पद्धतीने आणि मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात आरोग्यसेवक भरतीमध्ये घोटाळा झाला. सकाळी सकाळी पोपटपंची करणाऱ्यांनी यांचे स्मरण करावे, असे म्हणत सातपुते यांनी नाव न घेता संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

(Edited by Sachin Waghmare)

Tanaji Sawant, Ram Satpute
Tanaji Sawant : आरोग्यमंत्र्यांच्या गावाशेजारीच बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट; आरोग्य यंत्रणा सलाइनवर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com