MLA Sanjay Shinde : 'अजित पवार हेच माझं सरकार' म्हणणाऱ्या संजयमामांना मतदारसंघासाठी निधींची लॉटरी

Assembly Winter Session : डिसेंबरच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये बांधकामासाठी तरतूद केल्याची बजेट प्लेट जाहीर झाली.
Sanjaymama Shinde
Sanjaymama ShindeSarkarnama
Published on
Updated on

Karmala News: विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूरमध्ये सुरू असून, या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विविध मतदारसंघांतील विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. डिसेंबरच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये बांधकामासाठी तरतूद केल्याची बजेट प्लेट आज जाहीर झाली.

यामध्ये करमाळा मतदारसंघातील प्रमुख जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग, तलाठी व सर्कल कार्यालय बांधकामासाठी तब्बल 68 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. यामुळे करमाळा मतदारसंघातील विकासकामांना गती मिळणार आहे. दरम्यान, अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यापासून आमदार संजयमामा शिंदेंना आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी निधींची लॉटरीच लागली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjaymama Shinde
Priyank Kharge Statement : सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला जनता धडा शिकवेल; खर्गेंविरोधात भाजप आक्रमक

महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर मध्यंतरी काही विकासकामांच्या निधीला स्थगिती मिळाली होती. मात्र, त्यानंतर राज्यात पुन्हा राजकीय घडामोडी घडल्या आणि राष्ट्रवादीचा अजित पवार (Ajit Pawar) गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर मतदारसंघातील विकासकामांच्या निधीचा ओघ सुरू झाला.

यातच आता विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान डिसेंबरच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये बांधकामासाठी तरतूद केल्याची बजेट प्लेट जाहीर करण्यात आली. यामधून करमाळा मतदारसंघाला कोट्यवधींचा निधी मिळवण्यास यश आलं. या निधीमधून महत्त्वाच्या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. दरम्यान, "राज्यात सरकार कुणाचं आहे, माहीत नाही, परंतु माझ्यासाठी अजित पवार हेच माझं सरकार" म्हणणाऱ्या संजयमामा शिंदेंना मात्र मतदारसंघाठी निधींची लॉटरी लागली आहे.

Sanjaymama Shinde
Solapur Politics: मोहिते पाटलांना धक्का; संजयमामा शिंदेंना जयवंतराव जगतापांचा पाठिंबा जाहीर

कोणत्या विभागाला किती निधी मिळाला ?

या निधीमधून महसूल विभागातील 8 मंडळ अधिकारी कार्यालय व 20 तलाठी कार्यालयांची बांधकामे करण्यासाठी 4 कोटी 20 लाख निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच पारेवाडी ते वाशिंबे रस्ता मोठ्या पुलाचे बांधकाम करणे - 3 कोटी 47 लाख, कुगाव चिखलठाण शेटफळ जेऊर या रस्ता - 4 कोटी 90 लाख, पांडे शेलगाव क घोटी केम या रस्ता - 2 कोटी, कोर्टी दिवेगव्हाण पारेवाडी रेल्वे स्टेशन रस्ता -3 कोटी, रायगाव वीट झरे पोपळज केडगाव रस्ता - 1 कोटी, मिरगव्हाण अर्जुननगर शेलगाव क सौंदे वरकटणे या रस्ता - 1 कोटी, बोरगाव करंजे मिरगव्हाण निमगाव नेरले वरकुटे रस्ता -1 कोटी, वांगी नंबर 2 ते इजीमा 12 या रस्ता - 2 कोटी, फिसरे हिसरे हिवरे ते कोळगाव रस्ता - 2 कोटी, केतुर 2 ते केतुर 1 वाशिंबे सोगाव रस्ता या रस्त्याचे रुंदीकरणासह काम करण्यासाठी 7 कोटी 50 लाख.

मांजरगाव कोर्टी ते जिल्हा हद्द रस्ता - 5 कोटी, केतुर 2 ते केतुर 1 वाशिंबे सोगाव रस्ता -5 कोटी, उमरड ते कोठावळे धनगरवाडी रस्ता -1 कोटी ,सोगाव ते प्रजिमा क्र.3 रस्ता -1 कोटी 70 लाख असा तब्बल 41 कोटींचा निधी करमाळा तालुक्यातील रस्ते विकासासाठी मंजूर झालेला असून करमाळा मतदार संघाला जोडलेल्या 36 गावांसाठी 23 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे.

या निधीमधून कव्हे लहू म्हैसगाव या रस्ता - 2 कोटी 70 लाख, रोपळे क वडशिवणे ते कंदर या रस्ता - 2 कोटी 70 लाख, जिल्हा हद्द ते रिधोरे तांदूळवाडी सुलतानपूर रस्ता - 2 कोटी 40 लाख, अकोले खुर्द कन्हेरगाव निमगाव ढवळस रस्ता-2 कोटी, वडाचीवाडी ते सापटणे रस्ता - 1 कोटी 50 लाख, वडाचीवाडी ते शिंदेवाडी रस्ता - 1 कोटी 80 लाख, पिंपरी 2 कोटी, निमगाव ते ते उपळवटे 5 कोटी, रोपळे ते मुंगशी रस्ता - 80 लाख, कव्हे ते शिंगेवाडी रस्ता -1 कोटी, रोपळे बिटरगाव शिंगेवाडी रस्ता -1 कोटी 20 लाख अशी निधीची तरतूद केलेली आहे.

(Edited by- Ganesh Thombare)

Sanjaymama Shinde
Congress Protest : काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी फरपटत नेले; नागपुरात नेमकं काय झालं ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com