Nagpur winter session : जुन्या पेन्शनचा मुद्दा तापला; विरोधकांनी सरकारला घेरलं...

Assembly : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या काम बंद आंदोलनाचे पडसाद अधिवेशनात
Nagpur Winter Session
Nagpur Winter SessionSarkarnama
Published on
Updated on

Old Pension Scheme : राज्य कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शनचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील, अशी ग्वाही राज्यात सत्ताधारी शिंदे- फडणवीस सरकारने दिली होती. मात्र याबाबत ठोस निर्णय न घेतल्याने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पाठींबा दिला आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या काम बंद आंदोलनाचे पडसाद विधिमंडळ अधिवेशनात उमटण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) सुरू करावी, या मागणीसाठी सरकारी कर्मचारी संघटनांनी संप करून काम बंद आंदोलन सुरू केले होते. त्यावेळी यावर पुढील काही महिन्यांत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले होते.

Nagpur Winter Session
Dharashiv News: 'धाराशिव' साठी 'दादागिरी' नंतर आता शिवसेनेने ठोकला शड्डू...

जुन्या पेन्शनच्या मागणीवर 14 डिसेंबरपूर्वी निर्णय घ्यावा, अन्यथा पुन्हा कामबंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा संघटनांनी दिला होता. यासाठी हिवाळी अधिवेशन सुरू असताना विधानभवनावर मोर्चा देखील काढण्यात आला होता. कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी यांच्याबरोबर राज्यकर्त्यांनी बुधवारी चर्चा केली. मात्र त्यावर तोडगा न निघाल्याने गुरुवारपासून कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जुन्या पेन्शनसाठी सुरू करण्यात आलेल्या आंदोलनाबाबत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन आहेर म्हणाले की, राज्यकर्त्यांकडे संवेदनशीलता राहिलेली नाही. वेगळी दिशा देण्याचे काम हे सरकार करत आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही तरी फॉर्मुला काढला जाईल. प्रत्यक्षात मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही.

Nagpur Winter Session
Parliament Security Breach: संसदेत घुसखोरी करणाऱ्या अमोल शिंदेची बाजू असीम सरोदे कोर्टात मांडणार

दिलेला शब्द फिरविणे हे या सरकारचे काम आहे, कर्मचारी संघटनांना जुन्या पेन्शन चा शब्द देण्यात आला होता. मात्र त्यावर निर्णय न घेणे हा राज्य सरकारचा पळकुटेपणा आहे,  अशा शब्दात अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली. आमदार रोहित पवार यांनीही कर्मचारी संघटनांनी सुरू केलेल्या कामबंद आंदोलनावर राज्य सरकारवर कडक शब्दात टीकास्त्र सोडले.

(Edited By - Rajanand More)

Nagpur Winter Session
Nagpur Winter Session : रोहित पवारांच्या 'युवा संघर्ष'विरुद्ध नागपुरात गुन्हा दाखल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com