Nana Patole Vs Modi : 'निवडणुकीवेळी मोदींना पाकिस्तानची आठवण येणं म्हणजे, नक्कीच...' ; पटोलेंचा पलटवार!

BJP Vs Congress : मोदींनी अहमदनगर आणि बीडमधील प्रचारसभेत बोलताना काँग्रेसवर केली होती जोरदार टीका
Nana Patole Vs Modi
Nana Patole Vs ModiSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यामधील मतदान मंगळवारी पार पडले. महाराष्ट्रात 11 मतदारसंघामध्ये या टप्प्यात मतदान झाले. एकीकडे या मतदारसंघांमध्ये मतदान सुरू होते, तर दुसरीकडे अहमदनगर आणि बीडमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीर सभा झाल्या.

यावेळी मोदींनी बोलताना काँग्रेसवर जोरदार टीका केली, शिवाय काँग्रेस दहशतवाद्यांना निर्दोष असल्याचे प्रमाणपत्र वाटत आहे आणि काँग्रेसची पाकिस्तानात बी टीम असल्याचे मोदींनी म्हटले. ज्यावरून काँग्रेसने आता मोदींवर गंभीर आरोप केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी तर, मोदींचे थेट पाकिस्तानशी संबंध असल्याचा आरोप केला. तसेच निवडणुकीच्या काळाता पाकिस्तानची आठवण काढणं म्हणजे मोदींच्या पायाखालची जमीन सरकरली आहे. असं पटोलेंनी म्हटलं. शिवाय, मोदींना पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ल्याची आठवण येत असल्याचे म्हणत पटोले यांनी मोदींवर टीका केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nana Patole Vs Modi
Lok Sabha Election 2024: दहशतवाद, सीमेबाहेरून ट्विट, मुस्लिमांना आरक्षण; PM मोदींनी व्यक्त केली भीती

यावेळी नाना पटोलेंनी लोकसभेच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याप्रमाणेच तिसऱ्या टप्प्यातही काँग्रेस, महाविकास आघाडी आघाडीवर असल्याचे सांगून पुढील टप्प्यांमध्येही आघाडी कायम राहील असा विश्वास व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले? -

नगरमधील सभेत बोलताना मोदी (PM Modi) म्हणाले, 'देशातील इंडिया आघाडी आणि राज्यातील महाविकास आघाडीविषयी भीतीदायक चित्र उभे केले. "देशातील लोकसभा निवडणुकीला समोरे जाताना काँग्रेस (Congress) पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला क्लिन चीट देत आहे. निवडणुकीसाठी देशाच्या सीमेबाहेरून काँग्रेसच्या समर्थनात ट्विट सुरू झाले आहेत, असा गंभीर आरोप मोदींनी केला.

Nana Patole Vs Modi
Lok Sabha Election 2024: यंदा महाराष्ट्र तुम्हाला दिल्लीपर्यंत पोहोचू देणार नाही, ठाकरेंचा मोदी-शहांवर हल्लाबोल

तसेच, आघाडी देशात हतबल झाली आहे आणि त्यांची ही हतबलता देशाबाहेर दिसू लागली आहे. देशात ए-टीम हारली आहे. त्यामुळे काँग्रेसची देशाच्या सीमाबाहेरील बी-टीम अॅक्टीव्ह झाली आहे. देशाच्या सीमेबाहेरून काँग्रेसला समर्थन देणारे ट्विट केले जाऊ लागलेत. त्यामोबदल्यात काँग्रेस पाकिस्तानला (Pakistan) दहशतवादी हल्ल्यांमध्ये क्लिन चीट देऊ लागली आहे. असा आरोपही मोदींनी केला होता.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com