Nana Patole : नाना पटोलेंचा मोठा राजकीय स्फोट! 2024 विधानसभा निवडणुकीत IB च्या 'त्या' गुप्त रिपोर्टनुसार माविआचे किती आमदार निवडून येणार होते सांगत केली टीका

Nana Patole claims News : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार होते, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नाना पटोले यांनी अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातल्या वाडेगाव येथे बोलताना केला आहे.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on: 
Updated on: 

Akola News : राज्यात गेल्या काही दिवसापासून बोगस मतदानाच्या विरोधात मोहीम राबवली जात आहे. महाविकास आघाडीकडून गेल्या काही दिवसापासून मतचोरीच्या विरोधात आंदोलन केले जात आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण धावूं निघाले आहे. दुसरीकडे सीजेपी पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आता निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. त्यांच्या राजीनाम्यासाठी देशभर आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्यातच आता या बोगस मतदानावर थेट बोट ठेवत काँग्रेसचे नेते नाना पटोलेंचा मोठा राजकीय गौप्यस्फोट केला आहे.

राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले होते. त्यामुळे त्यानंतर होत असलेल्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळेल असे राज्यभर वातावरण होते. त्यावेळेसचे वातावरण पाहिल्यास राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार होते, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नाना पटोले यांनी अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातल्या वाडेगाव येथे बोलताना केला आहे.

2024 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या 75 आमदारांसह महाविकास आघाडीचे 160 आमदार निवडून येणार असल्याचा महत्वपूर्ण अहवाल सरकारी यंत्रणांनी दिला होता. या संदर्भातील महत्त्वपूर्ण अहवाल 'इंटेलिजन्स ब्युरो'ने सरकार आणि विरोधी पक्षांना दिला होता, असा खळबळजनक दावाही त्यांनी बाळापुर तालुक्यातल्या वाडेगाव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सभेत बोलताना केला आहे.

Nana Patole
BJP Politics : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मुस्लिम चेहरा; नितीन नवीन यांच्या टीममधील 'या' चेहऱ्याची तुफान चर्चा!

महागाईचा मोठा भडका उडणार

यावेळी नाना पटोले यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका करताना मतदानाच्या दिवशी संध्याकाळी पाचनंतर वाढवलेल्या मतदानाच्या बोगस आकडेवारीतून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येण्यापासून रोखण्याचा कट शिजला होता, असा आरोप त्यांनी केला आहे. यासोबतच पुढच्या काळात महागाईचा मोठा भडका उडणार असून पेट्रोलचे दर 400 रुपयांचा टप्पा ओलांडणार असल्याचा अंदाज आणि भिती त्यांनी व्यक्त केली.

Nana Patole
Shiv Sena Symbol Case : न्यायाधीशांच्या 'त्या' वक्तव्याने एकनाथ शिंदेंची धडधड वाढली; ठाकरेंच्या शिलेदाराने निशाणा साधला; म्हणाले,'योग्य ठिकाणी धनुष्यबाण...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com