Bjp News : भाजपचा मोठा निर्णय, 'त्या' बड्या नेत्याची तडकाफडकी हकालपट्टी; वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल प्रकरण भोवलं!

BJP viral audio clip controversy News : भाजप प्रदेश कार्यालयाकडून डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी पावले उचलली जात आहेत. त्यातूनच भाजपने आता अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे.
bjp flag
bjp flagsarkarnama
Published on
Updated on

Nandurbar News : भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली असतानाच आता नंदुरबार जिल्ह्यातील भाजपमधील अंतर्गत वाद चिघळला आहे. त्यामुळे भाजप प्रदेश कार्यालयाकडून डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी पावले उचलली जात आहेत. त्यातूनच भाजपने आता अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. भाजपचे माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. या कारवाईमुळे उत्तर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आणि भाजपच्या स्थानिक गोटात मोठी खळबळ उडाली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील भाजपच्या वरिष्ठ नेत्या व माजी खासदार हिना गावित यांच्याविरोधातील एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामुळे या प्रकरणी विजय चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. त्या ऑडिओ क्लिपमध्ये पक्षांतर्गत राजकारण आणि स्थानिक नेत्यांविरोधातील वादग्रस्त वक्तव्ये समोर आली आहेत. ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. त्यामुळे भाजपकडून ही धडक कारवाई करण्यात आली आहे.

भाजपच्या माजी खासदार हिना गावित यांच्याविरोधात काही दिवसांपूर्वी माजी महामंत्री विजय चौधरी यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या व्हायरल ऑडिओ प्रकारामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याची गंभीर दखल प्रदेश नेतृत्वाने घेतली. अखेर पक्षाने अधिकृत पत्रक जारी करत विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी करत असल्याची घोषणा केली. त्यासोबतच त्यांना पक्षातील सर्व प्राथमिक सदस्यत्वावरून आणि जबाबदाऱ्यांतून तात्काळ मुक्त करण्यात आले आहे.

bjp flag
BJP Audio Clip Controversy : भाजपमध्ये ऑडिओ क्लिपने खळबळ; माजी खासदारांना शिवीगाळ, अखेर बड्या नेत्याचा राजीनामा

अंतर्गत गटबाजी रोखण्याचे पक्षासमोर आव्हान

नंदुरबार भाजपमधील स्थानिक वाद वाढल्यास त्याचा परिणाम आगामी काळात होत असलेल्या निवडणुकांवर होणार आहे. त्यामुळेच भाजपकडून सावध पावले उचलली जात आहेत. त्यामुळेच भाजपने चौधरी यांच्यावर कठोर कारवाई करून शिस्तभंगाचा स्पष्ट संदेश दिला आहे. एका बाजूला नाराज नेत्यांना शांत करणे आणि दुसऱ्या बाजूला पक्षातील अंतर्गत गटबाजी रोखणे, हे मोठे आव्हान सध्या भाजप प्रदेश नेतृत्वापुढे आहे. त्यामुळे यातून कशा पद्धतीने मार्ग काढण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

bjp flag
Vijay Chaudhary : भाजपचा राजीनामा द्यावा लागला, विजय चौधरींच्या कथित व्हायरल ऑडिओ प्रकरणात मोठा ट्विस्ट, पोलिसांनी थेट खाजगी PA'ला उचललं...

भाजपकडून डॅमेज कंट्रोल, मुंबईत बैठकांचे सत्र

या घटनेनंतर भाजप प्रदेश कार्यालयात नंदुरबार कोअर कमिटीची तातडीची बैठक बोलावण्यात आली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे स्वतः या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेत आहेत. स्थानिक स्तरावरील गटबाजी आणि वाद मिटवण्यासाठी भाजपकडून जोरदार 'डॅमेज कंट्रोल' सुरू करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com