BJP Audio Clip Controversy : भाजपमध्ये ऑडिओ क्लिपने खळबळ; माजी खासदारांना शिवीगाळ, अखेर बड्या नेत्याचा राजीनामा

BJP Vijay Chaudhary Vs Heena Gavit Politics : नंदुरबारच्या राजकारणात सध्या भारतीय जनता पक्षात गटबाजी पाहायला मिळत असून गावित विरुद्ध अन्य असा संघर्ष सुरू झाला आहे.
BJP
BJP Sarkarnama
Published on
Updated on

Gavit Vs Choudhary News : नंदुरबारच्या राजकारणात माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित विरुद्ध अन्य असे भाजपमध्ये राजकारण सुरू आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षात गटबाजी चिंतेचा विषय होती. आता ही गटबाजी शिगेला पोहोचली आहे. नंदुरबार भाजपमध्ये माजी खासदार डॉ. हिना गावित विरुद्ध प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी या गटांत राजकीय वादाचा भडका उडाला आहे. त्याला सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप्स निमित्त ठरले. त्यामुळे नंदुरबार भाजप गटबाजीग्रस्त झाला आहे.

भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी आणि नगरसेवक संदीप चौधरी यांच्या फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यामध्ये माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्याविषयी वादग्रस्त संवादासह शिवीगाळ होती. या क्लिप व्हायरल झाल्याने आता नंदुरबारच्या राजकारणात भूकंप आला आहे.

तर एका पाठोपाठ एक अशा सात ते आठ ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या असून यामुळे गावित समर्थक चांगलेच संतापले आहेत. संतप्त झालेल्या गावित समर्थकांनी यानंतर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यानंतर आता हे प्रकरण थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत गेले असून दोन्ही गटाच्या तक्रारी पोहचल्या आहेत.

BJP
BJP Conflict : भाजपमध्ये २२ कोटींच्या टेंडरने मोठे वादळ : माजी आमदाराची महापालिका आयुक्तांना हटवण्यासाठी चंद्रकांतदादांमार्फत फिल्डिंग

माजी आमदार शरद गावित यांच्या मुलाने भाजप नेते विजय चौधरी यांच्या विरोधात पोलिसात ॲट्रॉसिटीची तक्रार दाखल केली. त्याला उत्तर म्हणून विजय चौधरी यांच्या मुलाने ही बनावट ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याची तक्रार केली. यातील कोणती तक्रार खरी, हा वादाचा आणि तपासाचा भाग आहे.

मात्र लोकसभा निवडणुकीपासून गावित समर्थक विरुद्ध पक्षातील व अन्य विरोधक यांच्यात सुरू असलेल्या वादाला यानिमित्ताने नवी फोडणी मिळाली. ऑडिओ क्लिप संभाषणाने भाजपमधील गटबाजीचा भडका उडाला. त्यात सध्या विजय चौधरी यांना राजीनामा द्यावा लागला. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या डॉ. गावित यांचा पराभव झाला. त्यात महायुतीच्या सहकारी पक्षांचा हातभार होता. भाजपमधील गावितविरोधी गटही गावित यांच्या पराभवाला तेवढाच कारणीभूत ठरला.

नंदुरबारच्या राजकारणात आमदार, खासदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि सर्वच सत्तापदांवर डॉ. विजयकुमार गावित कुटुंबीय विराजमान होते. भाजपच्या अन्य नेत्यांना त्यात कधीच शिरकाव करता आला नाही. या सत्तास्पर्धेतून गावित विरुद्ध अन्य सर्व, अशी राजकीय स्पर्धा आणि गटबाजी वाढली.

BJP
Congress Vs BJP: सर्वोच्च न्यायालयाचा काँग्रेस आमदाराला मोठा धक्का,भाजपच्या पराभूत उमेदवाराला दिलासा; निकाल फिरणार?

ऑडिओ क्लिपच्या राजकारणाने भाजपमधील अंतर्गत संघर्षाला नवी धार आली आहे. त्यातूनच विजय चौधरी यांना राजीनामा द्यावा लागला आहे. त्यामुळे गावित कुटुंबीय वरचढ ठरले, अशी स्थिती आहे. मात्र यातून आगामी काळात भाजपमधील वाद अधिक टोकदार होणार, हे नक्की.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com