Naresh Mhaske News : माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांनी विधानसभा निवडणूकीसाठी भाजप 288 जागा लढेल, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे भाजप स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी करत असल्याच्या चर्चा होत्या. नारायण राणेंच्या वक्तव्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिलेदार, खासदार नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
तेच जर 288 जागा लढवणार असतील तर महायुती कसली? असा सवाल नरेश म्हस्के यांनी करत 288 जागा लढण्याचा निर्णयाबाबत नारायण राणे यांनी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत आहे.
नारायण राणे यांनी ते 288 जागांवर लढणार असल्याचे सांगितले. जर ते 288 जागा लढत असतील तर महायुती कसली? 288 जागांवर लढण्याचे मत नारायण राणे यांचे वैयक्तीक आहे. त्यावर मी बोलणे योग्य होणार नाही, असा टोला देखील म्हस्के यांनी लगावला.
जागा वाटपाबाबत महायुतीमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री हे एकत्र बसून घेतील. प्रत्येक पक्षाच्या ताकदीनुसार जागा मिळतील. त्यामुळे राणेंच्या वक्तव्यावर पॅनिक होण्याची आवश्यकता वाटत नाही, अरे म्हस्के म्हणाले.
महायुतीमध्ये भाजप, शिंदे गट, राष्ट्रवादी (अजित पवार गट) एकत्र असले तरी त्यांनी विधानसभेच्या दृष्टीने 288 जागांचे सर्वेक्षण करत आहेत. प्रत्येक पक्ष आपल्या ताकद तपासण्याची असे सर्वेक्षण करत असल्याचे धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले. अजित पवार गट 288 जागांवर सर्वेक्षण करत असला तरी 100 टक्के जिंकणाऱ्या 80 जागांवर उमेदवार उभे करणार असे म्हटले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.