Narayan Rane News : नारायण राणेंनी कट्टर विरोधक उद्धव ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; म्हणाले...

Political News : नारायण राणे यांनी शुक्रवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण यावेळी त्यांनी खोचक शब्दांत त्यांच्यावर निशाणादेखील साधला.
Narayan Rane Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भाजप नेते नारायण राणे व माजी मुख्यमंत्री कधीच एकमेकांविषयी चांगले बोलत नाहीत. नेहमीच एकमेकांवर जहरी टीका करीत सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. दोघेंही एकमेकांवर आरोप करण्याची कधीच संधी सोडत नाही. त्यामुळे दोघांतील हे नेहमीच ताणलेले असलेले संबंध सर्वांनाच माहित आहेत. त्यातूनच नारायण राणे यांनी शुक्रवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण यावेळी त्यांनी खोचक शब्दांत त्यांच्यावर निशाणादेखील साधला.

उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना नारायण राणेंनी (Narayan Rane) खोचक शब्दांत टीका केली. “उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या इच्छा पूर्ण होवोत. देव तुम्हाला चांगले बोलण्याची बुद्धी देवो. भावीला काही अर्थ नाही, भावीच राहतो. उद्धव ठाकरेच्या पक्षाला गळती लागली आहे, असा खोचक टोला राणे यांनी यावेळी लगावला. (Narayan Rane News)

त्यासोबतच यावेळी बोलताना राणे यांनी टीका करण्याची संधी सोडली नाही. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांच्या बजेटमध्ये काय दिवे लावले याची माहिती माझ्याकडे आहे. 4.5 लाख कोटींचा बजेट आहे. ठाकरेंना बजेट कळतच नाही. 2020-21 ला 71 हजार कोटींची वित्तीय तुट आहे. उद्धव ठाकरेंनी बजेटवर बोलू नये. आमचा अर्थसंकल्प सर्वकष आहे, असे म्हणत राणे यांनी निशाणा साधला.

उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर टीका केली होती. या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरीव अशी कोणतीही तरतूद करण्यात आली नसल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यावर राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. देशाच्या बजेटमध्ये महाराष्ट्र नाही म्हणतात. उद्या महाराष्ट्राच्या बजेटमध्ये कलानगर दिसत नाही म्हणतील. केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्राला मिळालेल्या योजना किती? भारताला 10 वरून 5 व्या क्रमांकावर अर्थव्यवस्थेत आणले आहे, याकडेही लक्ष दिले पाहिजे.

Narayan Rane Uddhav Thackeray
Nitin Gadakri News : नितीन गडकरींची मोठी घोषणा; टोल प्लाझा होणार बंद अन्...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे जरी म्हणत असतील ते 200 पेक्षा जास्त जागा लढविणार आहेत. ते त्यांचे हे जागांचे आकडे निवडणूक जाहीर होण्यापर्यंत सांगतील. पण त्यानंतर सर्व बदल होईल. जागांचे आकडे वाढतील किंवा कमी होतील, त्यामध्ये बराच बदल होऊ शकतो, असे सांगत नारायण राणे यांनी राज ठाकरे हे येत्या काळात महायुतीसोबत असतील, असे सांगण्याचा प्रयत्न केला.

Narayan Rane Uddhav Thackeray
Babajani Durani: अजितदादांना धक्का; नाराज दुर्राणींचे घरवापसीचे संकेत, 'या' मतदारसंघातून निवडणूक लढणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com