Narendra Modi Viral Photo : 12 वर्षातील पहिला पराभव! नरेंद्र मोदी, अमित शाहांचा चेहराच पडला! संसदेतील 'तो' फोटो पाहिला का?

Women Reservation Bill Rejected : महिला आरक्षणाच्या संदर्भातील घटना दुरुस्ती विधेयक मतानंतर लोकसभेत नामंजूर झाले. त्यानंतरचा अमित शाह, नरेंद्र मोदी यांचा फोटो समोर आला आहे.
Viral image of Narendra Modi and Amit Shah circulates after Women’s Reservation Amendment Bill rejection, sparking political discussions.
Viral image of Narendra Modi and Amit Shah circulates after Women’s Reservation Amendment Bill rejection, sparking political discussions.sarkarnama
Published on
Updated on

Narendra Modi News : महिला आरक्षणाच्या संदर्भातील घटना दुरुस्ती विधेयक शुक्रवारी रात्री नामंजूर झाले. विरोधकांनी ऐकी दाखवली. विधेयकाच्या मंजुरीसाठी 352 मतांची आवश्यकता होती. मात्र, विधेयकाच्या बाजुने केवळ 298 मतं तर विरोधात 230 मतं पडली. त्यामुळे हे विधेयक फेटाळण्यात आले. केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून मागील 12 वर्षातील हा सरकारचा पहिलाच मोठा पराभव मानला जातो आहे.

विधेयक मतदानानंतर फेटाळण्यात आल्याचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी जाहीर केले. तेव्हा सभागृहात बसलेल्या भाजप खासदारांच्या चेहऱ्यावरील निराशा स्पष्ट दिसत होती. त्यातही पहिल्या रांगेत बसलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना आपल्या चेहऱ्यावरची निराशा लपवता आली नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी निराशा असलेला फोटो सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला आहे. विधेयक नामंजूर झाल्यावर गृहमंत्री अमित शाह म्हणाले, काँग्रेस सत्तेत असताना सीमांकन रोखले होते आणि आजही ते तेच करत आहे. महिला आरक्षणाला इंडिया आघाडीला विरोध केला. एस, एसटीच्या जागा वाढवण्यासाठी त्यांनी विरोध केला आहे.

Viral image of Narendra Modi and Amit Shah circulates after Women’s Reservation Amendment Bill rejection, sparking political discussions.
Modi Government Bill: संसदेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींनी पंतप्रधानांना डिवचलं; म्हणाले,'मोदीजी का चेहरा देखा आपने?'

राहुल गांधींनी मोदींना डिवचले

राहुल गांधी यांनी विधेयक नामंजूर झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, 2023 मध्ये मंजूर झालेले विधेयक आणले असते तर आम्ही त्याला पाठींबा दिला असता. मात्र, या बीलाच्या माध्यमातून ते उत्तर दक्षिण अशी फूट पाडत होते. महिला पत्रकाराने आरक्षण बील आणि मतदारसंघ फेररचना विधेयक नामंजूर झाल्याबात काही प्रश्न विचारले असता त्यावर त्यांनी अधिकचं भाष्य टाळताना फक्त " मोदीजी का चेहरा देखा आपने?", असा डिवचणारा प्रतिप्रश्न केला.

Viral image of Narendra Modi and Amit Shah circulates after Women’s Reservation Amendment Bill rejection, sparking political discussions.
Rahul Gandhi News: राहुल गांधींच्या टोमण्यामुळे सत्ताधारी-विरोधक खळखळून हसले; म्हणाले,'माझ्या अन् पंतप्रधान मोदींच्या आयुष्यात पत्नीची...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com