

New Delhi News: केंद्रातील मोदी सरकारनं पूर्ण ताकद लावून आणलेला महिला आरक्षण- डिलिमिटेशन घटना दुरूस्ती विधेयक नामंजूर करण्यात आलं. या विधेयकांवर लोकसभेत सत्ताधारी-विरोधक जोरदार चर्चा झाल्यानंतर त्यावर मतदान घेण्यात आलं. हे विधेयक मंजूर होण्यासाठी त्याच्या बाजूने दोन तृतीयांश होणं गरजेचं होतं. पण विधेयकाच्या बाजूनं 298 तर विरोधात 230 खासदारांनी मतदान झाल्यानंतर हे विधेयक नामंजूर करण्यात आलं आहे. हा मोदी सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. यानंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देतानाच मोदी सरकारला डिवचलं आहे.
राहुल गांधी यांनी महिला आरक्षण- डिलिमिटेशन घटना दुरूस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर शुक्रवारी (ता.17 एप्रिल) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, "हे महिला आरक्षण बिल नसून,भारताचा निवडणूक नकाशा बदलण्याचा एक प्रयत्न होता. पण तो प्रयत्न आम्ही हाणून पाडला आहे.
राहुल गांधी म्हणाले, मी पंतप्रधानांना सांगू इच्छितो की, जर तुम्हांला महिला आरक्षण बिल हवंच आहे ना, तर मग 2023 मध्ये जे महिला आरक्षण बिल काढा. त्या विधेयकावर आजपासून अंमलबजावणी करा,असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
जर 2023 मध्ये जे महिला आरक्षण बिलाची अंमलबजावणी सरकारनं केली तर पूर्ण विरोधक त्याला समर्थन देतील.तसेच महिला आरक्षणाचं बिल आम्ही सर्वजण तातडीनं मंजूर करु", असं स्पष्ट मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं.यावेळी त्यांनी हे महिला बिल नसून लोकशाहीवरचा हल्ला होता, संविधानावरचं आक्रमण होतं.पण आम्ही सर्व विरोधकांनी त्यांना हरवलं असल्याचंही त्यांनी म्हटलं.
राहुल गांधी यांना यावेळी माध्यम प्रतिनिधींनी महिला आरक्षण बिल आणि मतदारसंघ फेररचना विधेयक नामंजूर झाल्यावरुन आणखी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला होता. पण कराहुल गांधींनी यावर अधिकचं भाष्य टाळताना फक्त " मोदीजी का चेहरा देखा आपने?", असा डिवचणारा सवाल केला.
महिला आरक्षण विधेयकावरून काँग्रेस नेते राहुल गांधींनी लोकसभेत मोदी सरकारवर जोरदार हल्ला केला होता. महिला आरक्षण व मतदारसंघ फेररचना विधेयकामुळे अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या प्रतिनिधित्वावर परिणाम होऊ शकतो. या भाजप सरकारनं आधी काही राज्यांमध्ये असे प्रयोग करून पाहिले असून आता तेच मॉडेल देशभर राबवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
तसेच महिला सशक्तीकरणाच्या नावाखाली केंद्रातील मोदी सरकारकडून आपली सत्ता मजबूत करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यावेळी केला. तसेच आसाम आणि जम्मू-काश्मीरप्रमाणे आता सत्ता राखण्यासाठी संविधानात बदल करून देशाचा नकाशा बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. महिला आरक्षण विधेयकाच्या नावाखाली सरकार देशातील ओबीसी आणि दलित समाजाची सत्ता हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे," असा धक्कादायक आरोपही राहुल गांधी यांनी संसदेत केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.