Devendra Fadnavis News : फडणवीसांचा नकार तरीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ, पंतप्रधान मोदींनी फोन करून काय सांगितले?

Narendra Modi : उपमुख्यमंत्री पद घेतले तर मी सत्तेत राहण्यासाठी लालसे पोटी उपमुख्यमंत्रील पद, मंत्रीपद स्वीकारतोय, असे वाटेल म्हणून मी सत्तेत सहभागी होण्यास नकार दिला, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Devendra Fadnavis Narendra Modi Eknath Shinde
Devendra Fadnavis Narendra Modi Eknath Shindesarkarnama

BJP Politics : दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे भाजपसोबत सत्ता स्थापन करणार होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशी शक्यता होती. मात्र, भाजप सत्तेत सहभागी होणार असून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील. आपण मंत्रीमंडळामध्ये असणार नाही, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र नंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री झाले. आधी मंत्रिमंडळात सहभागी होण्यास नकार दिल्यानंतर उपमुख्यमंत्री पद का स्वीकारले? त्यावेळी पंतप्रधान मोदींनी फोन करून काय सांगितले? याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या एका मुलाखतीमध्ये दिली आहे.

Devendra Fadnavis Narendra Modi Eknath Shinde
Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वाढवली आमदारांची धाकधूक, लोकसभेत लीड तरच...

एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्यासोबत जाण्याचा निर्णय झाला तेव्हा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे, असे माझे मत झाले. ते मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी बोललो. मात्र, आमच्या 115 जागा असताना ते कसे शक्य होऊ शकतं, असं पक्षाच्या वरिष्ठांना वाटले. मात्र, शिंदेंना मुख्यमंत्री पद दिले तर उद्धव ठाकरेंना Uddhav Thackeray मुख्यमंत्री पदाचे आश्वासन दिले असते तर त्यांनी ही मुख्यमंत्री केले असते असा संदेश जाईल, म्हणून वरिष्ठांनी देखील शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाला होकार दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

म्हणून सत्तेतून बाहेर राहण्याचा निर्णय

ज्यावेळी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय झाला त्यावेळी मी सत्तेतून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला. मी आधी मुख्यमंत्री होतो. उपमुख्यमंत्री पद घेतले तर मी सत्तेत राहण्यासाठी लालसे पोटी उपमुख्यमंत्रील पद, मंत्रीपद स्वीकारतोय, असे वाटेल म्हणून मी सत्तेत सहभागी होण्यास नकार दिला, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदींचा फोन

देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझा निर्णय पक्षाने मान्य केला होता. मात्र, शिंदेंच्या शपथविधीच्या दिवशी अमित शाह यांचा आणि नंतर पंतप्रधान मोदींचा फोन आला. त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची विनंती केली. पंतप्रधान मोदी म्हणाले, नेता म्हणून तुमचा संभ्रम असू शकतो कार्यक्रता म्हणून नसावा. सरकार बाहेरून चालवले जात नाही. हे सरकार व्यवस्थित चालले पाहिजे. आपण सर्वात मोठा पक्ष आहोत. या सरकारला चालवायचं आहे त्यासाठी आपली उपस्थिती आवश्यक आहे.

Devendra Fadnavis Narendra Modi Eknath Shinde
Balasaheb Thorath News : भाजपचा सुपडा साफ होणार, इंडिया आघाडीचं सरकार येणार; थोरातांचं कॉन्फिडन्स जोरात...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com