Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वाढवली आमदारांची धाकधूक, लोकसभेत लीड तरच...

Eknath Shinde : आपापल्या मतदारसंघातील मतांची टक्केवारी आणि महायुतीच्या उमेदवारांना मिळणाऱ्या मतांची आकडेमोड आमदारांनी सुरू केली आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

Maharashtra Politics : संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी भाजप आग्रही असतांना शिंदेंनी आपली पूर्ण शक्तीपणाला लावून ही जागा आपल्याकडे खेचून घेतली. महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांना निवडून आणण्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रामुख्याने आपल्या पक्षाच्या आमदारांवर टाकली होती. एवढेच नाही, तर लोकसभेत संदीपान भुमरे यांना विधानसभा मतदारसंघातून लीड मिळाली नाही, तर विधानसभेला उमेदवारी देताना याचा निश्चित विचार केला जाईल, असा इशाराही दिला होता.

Eknath Shinde
Sharad Pawar News : शिवसेनेसोबत 2014 ला सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न, शरद पवारांचा गौप्यस्फोट

दोन वर्षापूर्वी शिवसेनेत फूट पडली. यामध्ये मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने एकनाथ शिंदेंना भक्कम साथ दिली. जिल्ह्यातील सहा पैकी पाच आमदारांनी शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. याचे बक्षिस राज्यातील सत्तांतरानंतर संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार यांना कॅबिनेट मंत्री पदाच्या स्वरुपात देण्यात आले. एवढेच नाही तर

जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना Shivsena आणि भाजप या दोन पक्षाचे आमदार, मंत्री आहेत. पैकी लोकसभेचे उमेदवार असलेले संदीपान भुमरे, अल्पसंख्याक व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांचे विधानसभा मतदारसंघ लोकसभेला जालन्यात येतात. त्यामुळे या दोघांच्या कामाचे मुल्यमापन रावसाहेब दानवे Raosaheb Danve यांच्या निकालानंतर केले जाईल. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील शहरी भागात पूर्व-पश्चिम आणि मध्य असे तीन विधानसभा मतदारसंघ येतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पैकी पूर्वचे आमदार राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे हे आहेत. तर पश्चिम संजय शिरसाट, मध्य प्रदीप जैस्वाल हे शिंदे सेनेचे आमदार आहेत. 63 टक्के मतदान झाल्याची नोंद समोर आल्यानंतर शहरातील पूर्व-पश्चिम आणि मध्य या तीनही मतदारसंघात 60 ते 62 टक्के एवढ्या मतदानाची नोंद झाली आहे. तर ग्रामीण मधील कन्नड, वैजापूर- गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघात सरासरी 61 टक्के मतांची नोंद झाली आहे.

शहराप्रमाणेच ग्रामीणच्या गंगापूरमध्ये भाजपचे प्रशांत बंब, वैजापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे प्रा. रमेश बोरनारे, तर कन्नड मतदारसंघात ठाकरे गटाचे उदयसिंह राजपूत यांच्यावर जबाबदारी होती. संदीपान भुमरे यांना या पैकी कोणाच्या मतदारसंघातून सर्वाधिक मतदान होते आणि कोणाच्या कमी? याचे मुल्यमापन चार जूनच्या निकालानंतर होणार आहे.

ज्याच्या मतदारसंघातून लोकसभेला लीड त्यालाच विधानसभेला लिफ्ट, असे धोरण मुख्यमंत्र्यांनी ठरवले आहे. त्यामुळे आपापल्या मतदारसंघातील मतांची टक्केवारी आणि महायुतीच्या उमेदवारांना मिळणाऱ्या मतांची आकडेमोड सुरू केली आहे. आता निकाल लागेपर्यंत या सगळ्या आमदारांची धाकधुक कायम राहणार आहे.

(Edited By Roshan More)

Eknath Shinde
Baramati Lok Sabha : 'गुलाल आपलाच...' सुप्रिया सुळेंसाठी ठाकरे गटाचा उत्साह शिगेला, अभिनंदनाचे बॅनर झळकले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com